OMG! कोणी केली नाकाची सर्जरी तर कुणी ओठांची, प्लास्टिक सर्जरीनं या अभिनेत्रींचं पालटलं रुपडं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 12:49 IST2024-12-31T12:35:11+5:302024-12-31T12:49:58+5:30

सिनेमा किंवा टीव्ही इंडस्ट्रीतील अभिनेत्री केवळ सुंदर दिसण्यासाठी फक्त विविध प्रकारचे मेकअप उत्पादने वापरत नाहीत तर प्लास्टिक सर्जरीचा देखील अवलंब करतात.

सिनेमा किंवा टीव्ही इंडस्ट्रीतील अभिनेत्री केवळ सुंदर दिसण्यासाठी फक्त विविध प्रकारचे मेकअप उत्पादने वापरत नाहीत तर प्लास्टिक सर्जरीचा देखील अवलंब करतात. काही अभिनेत्रींचे दिसणे इतके बदलले आहे की तुम्ही त्यांना ओळखू शकणार नाही. बोटॉक्स आणि फिलर्स करवून घेणे काही नायिकांसाठी फायदेशीर तर काहींना महागात पडलं.

आदिती राव हैदरीचे जुने फोटो पाहून कोणीही थक्क होईल. तिचे जुने आणि नवीन फोटो पाहून चाहत्यांना विश्वास आहे की अभिनेत्रीने नाकाची शस्त्रक्रिया केली आहे. तसेच, तिचे फोटो पाहिल्यानंतर, लोक असेही म्हणतात की तिने फॅट काढण्यासह चेहऱ्याशी संबंधित अनेक शस्त्रक्रिया केल्या आहेत. मात्र, अभिनेत्रीने हे कधीच मान्य केले नाही.

श्रुती हासनने नाकाची शस्त्रक्रिया देखील केली आहे आणि तिचा लूक चांगला दिसण्यासाठी फिलर्सचा देखील सहारा घेतला आहे आणि अभिनेत्रीने स्वतः हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला आहे.

रब ने बना दी जोडीमधून डेब्यू करणाऱ्या अनुष्का शर्माने लिप जॉब म्हणजेच फिलर्स केले आहेत. रणबीर कपूरसोबत बॉम्बे वेल्वेट या चित्रपटासाठी तिने लिप फिलर्स केले होते. २०१७ मध्ये एका मुलाखतीत तिने स्वतः ही गोष्ट मान्य केली होती.

मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर प्रियंका चोप्रावर पॉलीपेक्टॉमीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती, जी बिघडली होती. यामुळे ती खूप चर्चेत आली होती. इतकेच नाही तर तिच्या हातून अनेक चित्रपट प्रकल्पही निसटले होते. नंतर अभिनेत्रीने नाकावर पुन्हा शस्त्रक्रिया करून व्यवस्थित करून घेतले.

शोभिता धुलिपालाचे जुने फोटो पाहिल्यानंतरही तुम्ही तिला ओळखू शकणार नाही. असे मानले जाते की अभिनेत्रीने तिच्या ओठांवर फिलर्स केले आहेत आणि तिच्या जॉ लाइनवर देखील काम केले आहे. तिने तिच्या भुवयांसाठी मायक्रोब्लेडिंगचा अवलंब केला आहे.

अभिनेत्री कोयना मित्राने प्लास्टिक सर्जरी केली. तिने नाकाची सर्जरी केली. मात्र या सर्जरीमुळे कोयनाचा चेहरा आणखी खराब झाला. कोयनाला या सर्जरीमुळे काम मिळणं बंद झालं.

कतरिना कैफने सुंदर दिसण्यासाठी ओठ आणि नाकाची सर्जरी केली होती. या शस्त्रक्रियेनंतर अभिनेत्रीच्या चेहऱ्यात बराच बदल झाल्याचे दिसून आले.

मिनिषा लांबाचे ओठ पातळ होते. ओठ वाढवण्यासाठी तिने ओठांची शस्त्रक्रिया केली होती. मात्र या शस्त्रक्रियेमुळे तिचा चेहरा विद्रूप झाला.

सोफिया हयातनेही शस्त्रक्रिया केली होती. शस्त्रक्रियेनंतर अभिनेत्रीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. जरी अभिनेत्री म्हणाली होती की तिला ट्रोलर्सची पर्वा नाही

उर्फी जावेदने लिप फिलर केले होते. त्यामुळे तिचा चेहरा सुजला असल्याचे अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर सांगितले होते.

सुंदर दिसण्यासाठी आयशा टाकियाने प्लास्टिक सर्जरी केली होती. सर्जरीनंतर अभिनेत्रीचा चेहरा विद्रूप झाला होता.

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतनेही अनेक शस्त्रक्रिया केल्या आहेत. अभिनेत्रीनेही तिच्या मुलाखतीत हे मान्य केले आहे.