Oscars Trivia : interesting facts of Academy Award Oscars 2024 Winners Oppenheimer Emma Stone
Oscars विषयी या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 12:51 PM2024-03-11T12:51:26+5:302024-03-11T13:29:40+5:30Join usJoin usNext सध्या सोशल मीडियावर ऑस्कर २०२४ चे अनेक व्हिडीओ, फोटो व्हायरल होत आहेत. 96th Academy Awards : मनोरंजनविश्वातील प्रतिष्ठित आणि मानाचा समजला जाणारा ऑस्कर सोहळा कॅलिफोर्नियामधील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. यंदाच्या ९६व्या अकादमी पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. ऑस्कर २०२४मध्ये ओपनहायमर हा सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला. ओपनहायमरनं सर्वोत्कृष्ट चित्रपटासह सात पुरस्कार जिंकले सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता किलियन मर्फी, सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता रॉबर्ट डाउनी ज्यु, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन, ओरिजनल स्कोअर, फिल्म एडिटिंग, सिनेमॅटोग्राफी असे पुरस्कार ओपनहायमरनं जिंकले आहेत. तर यंदाच्या ऑस्करमध्ये इमा स्टोन सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे. 'पुअर थिंग्ज'मधील अभिनयासाठी इमा स्टोनला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर ऑस्करविषयी काही खास गोष्टी आपण जाणून घेऊयात.. ऑस्कर समारंभाचे अधिकृत नाव 'अकादमी अवॉर्ड्स ऑफ मेरिट' असं आहे. तर अकादमी पुरस्कार हा सुमारे 24 श्रेणींमध्ये दिला जातो. अकादमी पुरस्कार हा 'अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस'च्या सदस्यांद्वारे प्रदान केला जातो. पहिला अकादमी पुरस्कार हा 1929 मध्ये देण्यात आला होता. 16 मे 1929 रोजी लॉस एंजेलिसमधील हॉलिवूड रुझवेल्ट हॉटेलमध्ये आयोजित केला होता. ऑस्कर सोहळ्यात 'सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार' हा सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. सर्वाधिक ऑस्कर जिंकण्याचा विक्रम वॉल्ट डिस्नेच्या नावावर आहे. ज्यांना 59 वेळा नामांकन मिळालं आणि 26 वेळा जिंकण्यात यश आलं. ऑस्कर पुरस्काराची प्रत्येक ट्रॉफी बनवण्यासाठी सुमारे 500 डॉलर्स खर्च येतो. टॅग्स :ऑस्करसेलिब्रिटीहॉलिवूडसिनेमाOscarCelebrityHollywoodcinema