मनोज वाजपेयीेंचा डबल रोल ते Marvel च्या सीरिजचा पुढचा भाग, 'या' वीकेंडला OTT वर काय पाहाल?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 01:32 PM2024-01-12T13:32:58+5:302024-01-12T13:47:31+5:30

सस्पेन्स, थ्रील, रोमान्स आणि Action, 'या' वेबसीरिज/फिल्म्समुळे हा वीकेंड आहे खूपच खास

ओटीटीवर या वीकेंडला काय पाहाल असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे का? थ्रिलर आणि रोमँटिक कॉमेडीचे चाहते असाल तर या वीकेंडला तुम्हाला ओटीटीवर भरपूर कंटेंट पाहायला मिळणार आहे. घरबसल्या एकापेक्षा एक वेगवेगळ्या विषयावरचा कंटेंट पाहता येणार आहे. नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम आणि हॉटस्टार या मुख्य ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही सीरिज आणि चित्रपट रिलीज झाले आहेत जे तुम्ही या वीकेंडला Binge watch करु शकता.

*किलर सूप*: मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) आणि कोंकणा सेन शर्मा (Konkana Sen Sharma) यांची मुख्य भूमिका असलेली 'किलर सूप'(Killer Soup) ही वेबसीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. ही एक क्राईम थ्रिलर सीरिज आहे. स्वाती शेट्टीच्या भूमिकेत असलेल्या कोंकणा सेन शर्माच्या अवतीभोवती सीरिजची कहाणी आहे. तर मनोज वाजपेयींचा यामध्ये डबल रोल आहे. मनोज वाजपेयी हे स्वाती शेट्टीचे पती प्रभाकर आणि बॉयफ्रेंड उमेश अशा दोन्ही भूमिकांमध्ये आहेत. पण जेव्हा पती प्रभाकरचा मृत्यू तेव्हा कहाणीत ट्वीस्ट येतो. ही इंटरेस्टिंग वेबसीरिज या वीकेंडला तुम्ही नक्कीच पाहू शकता.

'हॉटस्टार' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'द लीजेंड ऑफ हनुमान'चा (The Legend Of Hanuman) तिसरा सीझन रिलीज झाला आहे. ही एक अॅनिमेटेड सीरिज आहे. यामध्ये सत्तेच्या मोहात असलेला रावण आणि भगवान हनुमान यांची कहाणी आहे. 'द लीजेंड ऑफ हनुमान' च्या पहिल्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला होता.

हॉटस्टारवरच मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स टेलिव्हिजन सीरिजचा 10 वा भाग रिलीज झाला आहे. याचं नाव 'इको'(Echo) असं आहे. अमेरिकन माया लोपेजवर ही कहाणी आधारित आहे जी तिच्या past शी लढताना दिसत आहे आणि अडचणींचा सामना करत आहे. मार्वलच्या चाहत्यांसाठी ही सीरिज उत्सुकता वाढवणारी आहे.

अमेझॉन प्राईमवर एक हलकीफुलकी अॅक्शन कॉमेडी इंग्रजी फिल्म रिलीज झाली आहे. 'रोल प्ले'(Role Play) असं सिनेमाचं नाव आहे. आपल्या लग्नाच्या वाढदिवसाला कपल रोल प्ले करण्याचं ठरवतं. पण गोष्टी तेव्हा बिघडतात जेव्हा पतीला रोल प्ले वेळी पत्नीविषयी सर्वकाही कळतं. हा मजेशीर विषयावर आधारित सिनेमा बघून तुमचा वीकेंडचा वेळ नक्कीच चांगला जाऊ शकतो.

एप्पल टीव्ही + वर अमेरिकी फिल्म 'किलर्स ऑफ द फ्लावर मून' (Killers Of The Flower Moon) रिलीज झाली आहे. 1920 दशकातील ओक्लाहोमावर सिनेमाची कहाणी आधारित आहे.