'पक पक पकाक'च्या साळूने थाटलाय विदेशी नागरिकासोबत संसार; आता दिसते कमालीची सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 08:00 AM2022-03-22T08:00:00+5:302022-03-22T08:00:00+5:30

Narayani shahtri:नारायणी शास्त्री ही हिंदी टीव्ही अभिनेत्री आणि थिएटर आर्टिस्ट म्हणून ओळखली जाते.

२००५ साली प्रदर्शित झालेला पक पक पकाक हा चित्रपट साऱ्यांच्याच स्मरणात असेल.

या चित्रपटात नाना पाटेकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. तसंच चित्रपटातील साळूनेदेखील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

चित्रपटात गावरान ठसका दाखवणारी साळू खऱ्या आयुष्यात प्रचंड ग्लॅमरस आहे.

या चित्रपटात साळू ही भूमिका अभिनेत्री नारायणी शास्त्री हिने साकारली होती.

खऱ्या आयुष्यात नारायणी प्रचंड ग्लॅमरस आहे. सोशल मीडियावर ती सक्रीय असून अनेकदा तिचे फोटो शेअर करत असते.

२०१५ मध्ये नारायणीने विदेशी बॉयफ्रेंड स्टीवन ग्रेवरसोबत लग्न केलं. परंतु, जवळपास दीड वर्ष तिनेही गोष्ट सगळ्यांपासून लपवून ठेवली होती.

सध्या नारायणी मुंबईत राहत आहे. नारायणीचा मराठी कलाविश्वातील वावर जरी कमी असला तरीदेखील ती हिंदी कलाविश्वात सक्रीय आहे.

नारायणी शास्त्री ही हिंदी टीव्ही अभिनेत्री आणि थिएटर आर्टिस्ट म्हणून ओळखली जाते.

“क्युँकी सांस भी कभी बहू थी” या लोकप्रिय मालिकेत तिने केसरची भूमिका साकारली होती.

कुसुम, पिया का घर, नमक हराम, रिश्तों का चक्रव्यूह, फिर सुबह होगी, लाल ईश्क अशा अनेक टीव्ही मालिकेतून तिने आपले अढळ स्थान निर्माण केले.

पक पक पकाकनंतर ती ऋण या आणखी एका मराठी चित्रपटात झळकली. तसंच तिने घात, चांदणी बार, मुंबई मेरी जान, न घर के ना घाट के या बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे.