'नवा गडी नवं राज्य'मधली 'आनंदी' कुठे गायब झाली? इथे वेळ घालवतेय पल्लवी पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 18:11 IST2025-04-01T18:04:04+5:302025-04-01T18:11:47+5:30
'नवा गडी नवं राज्य' मुळे तिला आनंदी नावानेच आता ओळखलं जातं, कुठे आहे पल्लवी पाटील?

मराठी सिनेमा तसंच मालिकांमध्ये दिसलेली अभिनेत्री पल्लवी पाटील (Pallavi Patil). 'नवा गडी नवं राज्य' या गाजलेल्या मालिकेतील आनंदी या भूमिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली.
पल्लवीने 'क्लासमेट्स', 'बॉइज २', 'ट्रिपल सीट', 'तू तिथे असावे', 'शेंटिमेंटल' या सिनेमांमध्ये दिसली. 'क्लासमेट्स'मधील भूमिकेमुळेही तिला ओळखलं जातं.
पल्लवीला आता चाहते 'आनंदी' नावानेच ओळखतात इतकी ती प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. मात्र या मालिकेनंतर पल्लवी पुन्हा कोणत्या प्रोजेक्टमध्ये आलेली नाही. सध्या ती कुठे आहे आणि काय करतेय असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच.
काही दिवसांपूर्वी पल्लवी एका मुलाखतीत म्हणाली, "मालिकेमुळे मी खूप व्यस्त होते. पण आता मी माझ्या कुटुंबाला वेळ देत आहे. तसंच जास्तीत जास्त फिरण्याचा आनंद घेत आहे."
आधी मी माझ्या गावाला गेले. नंतर अक्कलकोटचं दर्शन घेतलं. खूप फिरले. अनेक लोकांना भेटले. मालिकेमुळे ज्यासाठी वेळ मिळत नव्हता ते सगळं केलं. तसंच जाहिराती, म्युझिक अल्बम्स करत आहे."
मला पुन्हा मालिकेच्या ऑफर्स आल्या होत्या. 'नवा गडी नवं राज्य'च्या वेळीही या ऑफर्स होत्या. पण मी त्यांना नकार दिला. कारण मला स्वत:साठी आणि कुटुंबासाठी वेळ द्यायचा होता.
पल्लवीचं 'क्षितीजापरी' हे गाणं काही दिवसांपूर्वीच रिलीज झालं होतं. तसंच तिचे समुद्रकिनारी काढलेले मादक फोटो व्हायरल झाले होते. यावरुन तिला ट्रोलही करण्यात आलं होतं.