pankaj triapthi starting days used to work in hotel went 7 days in jail know more
"नाटकात स्त्रीपात्र, हॉटेलमध्ये काम तर ७ दिवस तुरुंगात..." पंकज त्रिपाठीचे असेही किस्से By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 01:00 PM2023-08-04T13:00:27+5:302023-08-04T13:08:05+5:30Join usJoin usNext पंकज त्रिपाठी यांच्या आयुष्यातील कधीही न ऐकलेल्या गोष्टी बॉलिवूडमधील अतिशय प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi). न बोलता केवळ हावभावातूनही ते उत्तम अभिनय करतात. त्यांचा चाहता नाही असे लोक फार कमी असतील. सहज सुंदर अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. अक्षय कुमारच्या आगामी 'OMG 2' सिनेमात पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत आहेत. यामध्ये ते शिवभक्त असून मुलासाठी कोर्टात लढताना दिसणार आहेत. सिनेमाची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. पंकज त्रिपाठी यांच्याबद्दलचे असे अनेक किस्से आहेत जे तुम्ही आजपर्यंत ऐकले नसतील. पंकज त्रिपाठी यांना लहानपणापासूनच अभिनयाचं वेड होतं. ते गावोगावी होणाऱ्या नाटकांमध्ये सहभाग घ्यायचे आणि स्त्रीचीही भूमिका साकारायचे. लहानपणीच ते इतका कमाल अभिनय करायचे की प्रत्येकजण दंग असायचा. अगदी बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींनाही ते टक्कर देतील अशा शब्दात लोक त्यांची स्तुती करायचे. मात्र पंकज यांच्या वडिलांना त्यांचं नाटकात काम करणं अजिबातच आवडायचं नाही. लेकाने डॉक्टर व्हावं अशी त्यांची इच्छा होती. ते मुलाला खर्चासाठी पैसेही द्यायचे नाहीत. यामुळे पंकज त्रिपाठी यांनी एका हॉटेलमध्ये कुकचे काम सुरु केले. तिथे मिळणाऱ्या पैशातून ते खर्च चालवायचे आणि दिवसा थिएटरमध्ये काम करायचे. हे वाचून आश्चर्य वाटेल पण पंकज त्रिपाठी यांना तुरुंगातही जावं लागलं आहे. मगध विश्वविद्यालयात शिक्षण घेत असताना ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत जॉईन झाले होते. एकदा त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. त्यामुळे त्यांना एक आठवडा तुरुंगात जावे लागले होते. पंकज त्रिपाठी यांनी एकदा कीडेही खाल्ले होते. त्यांना कोणीतरी सांगितलं होतं की जर वेगाने धावायचं असेल तर हातात नदीचं पाणी भरुन कीडे खा. मग तुम्ही कीड्यांसारखंच वेगाने धावाल. त्याचं ऐकून पंकज त्रिपाठी यांनी खरंच कीडे खाल्ले होते. पंकज त्रिपाठी यांनी 'गँग्स ऑफ वासेपूर','मिर्झापूर' यासारख्या प्रोजेक्ट्समधून आपल्या अभिनयाची ताकद दाखवली आहे. बरेली की बर्फी सिनेमातीही त्यांनी क्रिती सेननच्या वडिलांची भूमिका साकारली जी सर्वांच्या लक्षात राहिली. तर मीमी सिनेमातील त्यांच्या भूमिकेचंही कौतुक केलं गेलं.टॅग्स :पंकज त्रिपाठीबॉलिवूडPankaj Tripathibollywood