प्राजक्ता माळीने सहकुटुंब साजरा केला आई-बाबांच्या लग्नाचा ४० वा वाढदिवस; नेटकऱ्यांनी फोटोला दिली पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 10:35 IST2025-02-11T09:31:53+5:302025-02-11T10:35:53+5:30

प्राजक्ता माळीने तिच्या आई-बाबांच्या लग्नाचा वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन केलंय (prajakta mali)

प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. प्राजक्ताला आपण विविध सिनेमांमध्ये, मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय

प्राजक्ता सोशल मीडियावर तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अपडेट्स देत असते. प्राजक्ताच्या घरी तिच्या आई-बाबांच्या लग्नाच्या ४० व्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यात आलं

प्राजक्ताने आई-बाबा, तिच्या भाच्या, भाऊ आणि वहिनी या फोटोमध्ये दिसत आहेत. प्राजक्ताने सर्वांसोबत आई-बाबांच्या लग्नाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं

या खास क्षणी प्राजक्ताचे जवळचे मित्र-मैत्रिणी, नातेवाईक उपस्थित होते. प्राजक्ताने सर्वांसोबत खास सेल्फी काढून आई-बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

प्राजक्ताने स्वतःच्या हाताने आई-बाबांचं औक्षण केलं. ४० वर्ष आई-बाबांनी एकमेकांना दिलेली साथ पाहून प्राजक्ता भारावली होती.

प्राजक्ताच्या आई-बाबांचं लग्न १० फेब्रुवारी १९८५ ला झालं. कितीही अडी-अडचणी आल्या तरीही आई-बाबांनी आयुष्य एकमेकांच्या साथीने जगलं; अशा शब्दात प्राजक्ताने पोस्ट लिहिली

प्राजक्ताच्या आजवरच्या करिअरमध्ये तिच्या आई-बाबांची तिला चांगली साथ मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी प्राजक्तावर जे आरोप लावण्यात आले त्यावेळेस प्राजक्ताची आई तिच्या पाठीशी उभी राहताना दिसली.