पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेह-तैमूरसाठी चिठ्ठीवर काय लिहिलं? कपूर कुटुंबाचे फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 15:21 IST2024-12-11T14:08:08+5:302024-12-11T15:21:11+5:30
संपूर्ण कपूर कुटुंबाने काल पंतप्रधान मोदींची भेट घेतली. त्यावेळी करीना - सैफच्या लाडक्या लेकांसाठी पंतप्रधान मोदींनी खास गोष्ट केलेली दिसून आली.

काल संपूर्ण कपूर कुटुंबाने पंतप्रधान मोदींची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींनी संपूर्ण कपूर कुटुंबाचं स्वागत केलं
यावेळी करीना कपूरजवळ पंतप्रधान मोदींनी एका चिठ्ठीवर जेह आणि तैमूरसाठी खास ऑटोग्राफ दिला. त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय
करिष्मा कपूरने यावेळी पंतप्रधान मोदींसोबत खास फोटो काढले. मोदींना भेटून करिश्मा कपूरला चांगलाच आनंद झालेला दिसतोय
१४ डिसेंबरला शोमॅन अशी ओळख असलेल्या राज कपूर यांची जयंती आहे. त्यानिमित्त कपूर कुटुंबाने एक फिल्म फेस्टिव्हल आयोजित केलाय.
या फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी संपूर्ण कपूर कुटुंब काल पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी गेलं होतं
संपूर्ण कपूर कुटुंबाने पंतप्रधान मोदींसोबत खास फोटो काढले. या फोटोत करीना-करिश्मापासून रणबीर कपूरही पाहायला मिळतोय.
सैफ अली खान आणि करीना कपूर या दोघांनीही पंतप्रधान मोदींसोबत खास फोटो काढले.