वयाच्या चाळीशीतही अभिनेत्रीच्या हॉटनेसची चर्चा; साऊथ नंतर आता बॉलिवूडमध्येही बोलबाला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 06:31 PM2024-06-18T18:31:12+5:302024-06-18T18:45:52+5:30

Priya Mani Photos: जवान, आर्टिकल 370, द फॅमिली मॅन यासारख्या लोकप्रिय कलाकृतींमधील अभिनयाचे कौतुक

Priyamani Photos: साऊथ इंडस्ट्री आणि नंतर बॉलिवूडमध्ये आपली छाप उमटवणारी अभिनेत्री म्हणजे प्रियमणी. द फॅमिली मॅन ही वेब सिरीज तर जवान, आर्टिकल 370 यासारख्या चित्रपटात तिने अभिनय केला आहे.

प्रियमणी ही तिच्या सौंदर्यासह हॉटनेस आणि फिटनेससाठीही ओळखली जाते. वयाची ४० वर्षे पूर्ण झाली असली तरी अजूनही तिच्या फिगरवर तरुण-तरुणी फिदा आहेत.

'झिरो फिगर' ही संकल्पना प्रियमणीला अजिबातच रूचत नाही. कुणी जर तिला बोटोक्स किंवा फिलर्सचा वापर करायला सांगितला तर ती असे चित्रपट थेट नाकारते असे तिनेच सांगितले.

२००२ साली अभिनेत्रींना सर्जरी किंवा त्यासारख्या गोष्टी करायला सांगितल्या जात नव्हत्या. मी आजही अशा कुठल्याही गोष्टी करून घेण्यास तयार नसते, असे प्रियमणी सांगते.

तुम्हाला चांगले दिसण्यासाठी शरीराच्या एखाद्या भागाची सर्जरी करायची असेल तर तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्हाला काय हवं आहे, ते तुम्हीच समजून घ्या, असा संदेश प्रियमणीने दिला आहे.

आजदेखील प्रियमणीने तिचे काही ग्लॅमरस फोटोज शेअर केले आहेत. या फोटोशूटमध्ये तिने ऑफव्हाईट ड्रेस घातला असून ती कमालीची हॉट & फिट दिसत आहे.