Priya Prakash Varrier: 'नॅशनल क्रश' प्रिया वारियरच्या 'बोल्ड & हॉट' लूकची चर्चा... पाहा Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 21:12 IST2022-07-15T21:07:36+5:302022-07-15T21:12:47+5:30
डोळ्यांच्या अदाकारीमुळे पहिल्यांदा आली होती चर्चेत

Priya Prakash Varrier: मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर ही एकेकाळची नॅशनल क्रश. तिचा एक रोमँटिक व्हिडीओ व्हायरल झाल्याने ती लोकप्रिय झाली होती. सध्या तिच्या हॉट फोटोंमुळे ती चर्चेत आली आहे. ( Bold & Hot Photoshoot)
प्रियाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. याआधी, प्रिया प्रकाश वॅरियर तिच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत होती. पण नंतर तिची फारशी चर्चा दिसून आली नव्हती.
सोशल मीडियावर तिच्या बेडरूम फोटोंनी खळबळ माजवली आहे. प्रियाने तिच्या फोटोशूटमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बेडरुम लूकचे हे अतिशय बोल्ड आणि बिनधास्त फोटो आहेत.
प्रियाच्या लेटेस्ट फोटोशूटमध्ये ती लाल रंगाच्या ओपन नेकलाइन टॉप आणि गुलाबी पोल्का डॉट लोअर लेगिन्समध्ये दिसत आहे. यामध्ये तिने गोल्डन इअर-रिंग्ज देखील घातले आहेत.
प्रिया या फोटोशूटमध्ये बेडवर पोज देताना दिसत आहे. प्रियाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर हे फोटो शेअर केले आहेत. या आधीही प्रियाने तिच्या सोशल मीडियावर अनेक हॉट फोटो शेअर केले होते.
दरम्यान, प्रिया वारियरचे आगामी काळात ३ चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. तिचा पहिला चित्रपट 'विष्णू प्रिया' नावाचा कन्नड भाषेतील चित्रपट आहे. बंगळुरू, म्हैसूर आणि चिकमंगळूरसह कर्नाटकातील विविध ठिकाणी चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे.