म्हणून सगळा आटापिटा! एका इन्स्टा पोस्टसाठी हे कलाकार घेतात इतकी फी, प्रियंका सर्वात महागडी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 03:27 PM2021-05-31T15:27:55+5:302021-05-31T15:36:14+5:30

सेलिब्रिटी सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह दिसतात, फॉलोअर्स वाढवण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात आणि का नाही? यासाठी त्यांना पैसे मिळतात. होय, बॉलिवूडचे कलाकार एका स्पॉन्सर्ड पोस्टसाठी लाखो रूपये घेतात. हे आकडे वाचून तुम्हीही चक्रावून जाल.

प्रियंका चोप्रा ही एका स्पॉन्सर्ड इन्स्टा पोस्टसाठी सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. विश्वास बसणार नाही पण, हॉपर्स एचक्यू 2020 च्या यादीनुसार, देसी गर्ल एका प्रमोशनल इन्स्टा पोस्टसाठी 1.80 कोटी रूपये घेते.

प्रियंकाच्या पाठोपाठ नंबर लागतो तो आलिया भट हिचा. आलिया भट एका इन्स्टा पोस्टसाठी 1 कोटी रूपये घेते.

दीपिका पादुकोण एका पोस्टसाठी 1 कोटीच्या घरात रक्कम घेते.

बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरूख हा सुद्धा 80 लाख ते 1 कोटी घेतो.

अभिनेता अक्षय कुमार हा सुद्धा मागे नाही. तो सुद्धा एका प्रमोशनल पोस्टसाठी 1 कोटीपर्यंत रक्कम घेतो.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहेत़ ते एका पोस्टसाठी जवळपास 50 लाख रूपयांची रक्कम स्विकारतात.

कतरिना कैफ ही एका इन्स्टा पोस्टसाठी 80 ते 90 लाख रूपये घेते.

अनुष्का शर्मा ही सुद्धा सोशल मीडियातून चांगली कमाई करते. एका प्रमोशनल पोस्टसाठी ती 90 ते 97 लाख रूपये घेते.

बॉलिवूडचा कबीर सिंग म्हणजेच अभिनेता शाहिद कपूरचे इंस्टाग्रामवर 24 मिलियन फॉलोव्हर्स असून तो स्पॉन्सर्ड पोस्टसाठी 20 लाख ते 30 लाख रुपये घेतो.

Read in English