priyanka chopra to meghan markle 2018 celebrity wedding cakes
#BestOf2018 : 2018 ठरलं सेलिब्रिटी वेडिंग ईयर; 'हे' वेडिंग केक पाहून व्हाल थक्क! By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 02:38 PM2018-12-31T14:38:00+5:302018-12-31T15:11:10+5:30Join usJoin usNext 2018 या वर्षात अनेक सेलिब्रिटी विवाह बंधनात अडकले. अगदी थाटामाटात डेस्टिनेशन वेडिंग करण्यास काहींनी प्राधान्य दिले. प्रियांका चोप्रासह अनेक लोकप्रिय सेलिब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकले. सेलिब्रिटींच्या लग्नात सर्वाधिक चर्चा रंगली ती त्यांच्या वेडिंग केकची. यावर्षी मोठ्या आकाराचे अत्यंत सुंदर केक विवाह सोहळ्यात पाहायला मिळाले. 2018 या वर्षातील लोकप्रिय वेडिंग केकबाबत जाणून घेऊया. अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांचा शाही विवाह सोहळा नुकताच पार पडला. जोधपूरच्या उमेद भवन पॅलेसमध्ये जगभरातील सेलेब्रिटींच्या मांदियाळीत हा विवाह सोहळा थाटात पार पडला. 1 डिसेंबरला निकचे वडील जोनास सिनीयर यांच्या उपस्थितीत ख्रिश्चन पद्धतीने व दुसऱ्या दिवशी हिंदु पद्धतीत लग्न झाले. प्रियांका व निकच्या लग्नात त्यांच्या वेडिंग केकची जोरदार चर्चा रंगली. केकची खासियत म्हणजे हा केक 6 मजली आणि 18 फूट लांबीचा होता. केक कापताना दोघेही प्रचंड आनंदी होते. प्रियांका-निकने हा केक तलवारीने कापला होता. ब्रिटनचे राजकुमार प्रिन्स हॅरी आणि अमेरिकन अभिनेत्री मेगन मार्कल यांचा शाही विवाहसोहळा थाटामाटात संपन्न झाला. विंडसर कॅसलमधील सेंट जॉर्ज चॅपलमध्ये 600 खास पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. शाही विवाह सोहळ्यासाठी अत्यंत सुंदर केक तयार करण्यात आला होता. Amalifi Lemon Curd आणि Elderflower Buttercream ने या केकचे फिलिंग तयार करण्यात आले होते. विन्डसर कॅसलमध्ये विवाहबद्ध होणारं हॅरी-मेघान हे राजघराण्यातलं सोळावं जोडपं ठरले आहे. या शाही विवाह सोहळ्याला विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. बॉलिवूडची अभिनेत्री व फॅशन दिवा सोनम कपूरने प्रियकर आनंद आहुजाबरोबर लग्नगाठ बांधली. शिख पद्धतीने सोनम-आनंदचा विवाह सोहळा संपन्न झाला. सोनमच्या लग्नातील दोन्ही केक खूपच सुंदर असल्याने प्रसिद्ध झाले होते. लग्नातील 6 मजल्याचा आकर्षक केक पाहिल्यावर सर्वच जण थक्क झाले होते. हिंदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री रुबीना दिलेक हिने बॉयफ्रेन्ड अभिनव शुक्लासोबत यावर्षी लग्न केले. या दोघांचं लग्न शिमलामध्ये झालं असलं तरी रुबीना ही हिमाचलची आहे तर अभिनव हा पंजाबचा आहे. रुबीना आणि अभिनवच्या रिसेप्शनमध्ये त्यांच्या हटके केकची चर्चा होती. केक स्टँडवर सर्वात वरती आकर्षक केक होता आणि खालच्या बाजूला छोटे छोटे कप केक ठेवण्यात आले होते. कॉमेडी नाईट्स विथ कपिल या कार्यक्रमाने लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या कपिल शर्माने त्याची प्रेयसी गिन्नी चतरथसोबत लग्नगाठ बांधली. कपिलने पंजाबी पद्धतीने लग्न केले. कपिल आणि गिन्नीच्या केकवर फुलांचे डिझाईन करण्यात आले होते. तसेच या केकवर गिन्नीचा G आणि कपिलचा K म्हणजेच GK लिहिण्यात आलं होतं. त्यामुळेच हा केक सर्वांचं लक्ष वेधून घेत होता. टॅग्स :लग्नप्रियांका चोप्रा आणि निक जोनासकपिल शर्मा सोनम कपूरmarriagePriyanka Chopra Nick Jonas WeddingKapil SharmaSonam Kapoor