बर्थडे पार्टीत मालती मेरीचा किलर स्वॅग! प्रियांका आणि निकची लाडकी लेक झाली दोन वर्षांची

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 01:37 PM2024-01-17T13:37:01+5:302024-01-17T14:01:35+5:30

'देसी गर्ल' प्रियांका चोप्राची लाडकी लेक मालती मेरी जोनासचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत असतात.

प्रियांकाने जेव्हापासून मालतीचा चेहरा दाखवला तेव्हापासून चाहत्यांना तिचं वेड लागलं आहे. तिचं कौतुक करताना चाहते थकत नाहीत.

प्रियांकाची लेक ही आता 2 वर्षांची झाली आहे.

प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांची मुलगी मालती मेरी चोप्रा जोनासचा जन्म 15 जानेवारी 2022 रोजी झाला होता. मालती आणि मेरी ही प्रियांकाची आई डॉ मधु चोप्रा आणि निकची आई डेनिस यांच्या आईंची नावे आहेत. यामधून प्रियंका आणि निकने अनोखा आदर्श सगळ्यांसमोर ठेवला आहे.

निक जोनास आणि प्रियंकाने मुलीचा वाढदिवस कुटुंबासोबत साजरा केला.

प्रियांकाचा पती निक जोनासने आपल्या लेकीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये मालतीच्या बर्थडे सेलिब्रेशनची झलक पाहायला मिळत आहे.

गुलाबी ड्रेस आणि गॉगलमध्ये मालती मेरी जोनास अगदी गोड दिसत होती. तिची क्यूट स्टाइल चाहत्यांना खूप आवडली. 2 वर्षांच्या मालतीचा स्वॅग पाहून चाहते प्रभावित झाले आहेत. एवढ्या लहान वयात मालतीचा किलर स्वॅग आणि आत्मविश्वास पाहून ती नक्कीच आई प्रियांकासारखीच असल्याचं चाहत्यांनी म्हटलं.

एका फोटोमध्ये मालती आणि निकचं बाँन्डिंगही पाहायला मिळत आहे. मालती कॅमेऱ्यासाठी आनंदाने पोज देताना दिसत आहे. निकने कॅप्शनमध्ये लिहलं, आमची Little Angel 2 वर्षांची झाली आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

फोटोंमध्ये मालतीच्या वाढदिवसाच्या केकही पाहायला मिळत आहे.

मालती मेरीच्या बर्थडे पार्टीत निकचे कुटुंबीय, मित्र सहभागी झाले.

मालतीच्या बर्थडे पार्टीची Elmo थीम होती.