priyanka chopra share pink monokini photos on instagram PSC
प्रियंका चोप्राने पहिल्यांदाच शेअर केले इतके बोल्ड फोटो, पाहून तुम्ही देखील म्हणाल कडक By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 03:35 PM2020-05-26T15:35:37+5:302020-05-26T15:35:37+5:30Join usJoin usNext सध्या लॉकडाऊन असल्याने सगळेच सेलिब्रेटी आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत. पण त्याचसोबत ते सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असून आपले अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. अभिनेत्री प्रियंका चोप्राने तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर तिचे अनेक बोल्ड अँड ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत. प्रियंकाने शेअर केलेले हे बोल्ड फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत. प्रियंकाने तिचे अनेक जुने फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केले असून ते देखील तिच्या फॅन्सच्या पसंतीस उतरत आहेत. प्रियंका सध्या निक जोनाससोबत क्वॉलिटी टाईम घालवत असून त्या दोघांचे देखील अनेक फोटो ती सोशल मीडियावर पोस्ट करते. प्रियंका आज बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री असून तिला सोशल मीडियावर तिचे चाहते मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात. प्रियंकाचा द स्काय इज पिंक हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. प्रियंकाला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या आगामी चित्रपटाची तिचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात आहेत.टॅग्स :प्रियंका चोप्राPriyanka Chopra