Priyanka-Nick's Kindle at the Grammy Awards Show
Grammy Awards 2020 : ग्रॅमी अवॉर्ड्स शोमध्ये प्रियांका-निकचा जलवा, पीसीचा ड्रेस पाहून लोकांना फुटला घाम! By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 03:42 PM2020-01-28T15:42:23+5:302020-01-28T16:54:19+5:30Join usJoin usNext प्रियांका चोप्रा व निक जोनास प्रियांका चोप्राने आज तिच्या अभिनयाने बॉलिवूडमध्येच नव्हे तर हॉलिवूडमध्ये देखील तिचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. मिस वर्ल्ड हा किताब मिळाल्यानंतर प्रियांकाने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला प्रियांकाने जीवनसाथी म्हणून देखील हॉलिवूड गायकाचीच निवड केली. प्रियांकाने लोकप्रिय गायक निक जोनासशी २०१८ मध्ये लग्न केलं. २६ जानेवारी २०२० ला प्रियांकाने निकसोबत ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात प्रियांकाच्या उपस्थितीपेक्षा तिने परिधान केलेल्या ड्रेसचीच सर्वाधिक चर्चा सुरु झाली तिचा ड्रेस काही चाहत्यांना फारसा रुचला नसून अनेकांनी तिला ट्रोल केले प्रियांकाने डिझायनर राल्फ रुसो यांनी डिझाइन केलेला गाऊन परिधान केला होता या ड्रेसचा पुढचा गळा प्रचंड डीप असल्यामुळे तिला ट्रोल करण्यात आलं आहे प्रियांका यापूर्वीदेखील तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे ट्रोल झाली आहे संगीत क्षेत्रातील दमदार कामगिरीसाठी ग्रॅमी पुरस्कार दिला जातो. यंदाच्या या सोहळ्यामध्ये संगीत क्षेत्राशी जोडलेल्या सर्व गायक, संगीतकारांनी हजेरी लावली होती. ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यामध्ये प्रियांका निकसोबत त्यांचे कुटुंबीयदेखील उपस्थित होते.टॅग्स :ग्रॅमी पुरस्कारप्रियंका चोप्रानिक जोनासGrammy AwardsPriyanka ChopraNick Jones