पतीकडून मारहाण ते करिअरची लागलेली वाट! 70 च्या दशकातील 'या' 6 अभिनेत्रींचे झाले हाल By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 07:00 AM 2022-08-23T07:00:00+5:30 2022-08-23T07:00:00+5:30
Bollywood actresses: सध्या अशाच काही अभिनेत्रींची चर्चा रंगली आहे, ज्या प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही वैयक्तिक आयुष्यात त्यांनी अनेक हालअपेष्टा सहन केल्या. बॉलिवूडमध्ये ७० चा काळ गाजवणाऱ्या अनेक अभिनेत्री आहेत. यातील काही अभिनेत्री आजही प्रेक्षकांमध्ये चर्चेत असतात. सध्या अशाच काही अभिनेत्रींची चर्चा रंगली आहे, ज्या प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही वैयक्तिक आयुष्यात त्यांनी अनेक हालअपेष्टा सहन केल्या. त्यामुळेच या अभिनेत्री कोणत्या ते पाहुयात.
राखी - बॉलिवूड अभिनेत्री राखी ज्याप्रमाणे त्यांच्या अभिनयामुळे चर्चेत राहिल्या त्याचप्रमाणे त्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आल्या. राखी यांनी २ वेळा लग्न केलं होतं. यात त्यांचं पहिलं लग्न कमी वयात झालं होतं. ज्यामुळे हे नातं फार काळ टिकलं नाही. त्यानंतर त्यांनी गुलजार यांच्यासोबत दुसरं लग्न केलं.
असं म्हटलं जातं की, राखी यांचं सिनेमात काम करणं गुलजार यांनी पसंत नव्हतं. ज्यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद व्हायचे. इतकंच नाही तर गुलजार यांनी त्यांना मारहाणही केली होती. ज्यामुळे त्या विभक्त झाल्या.
झीनत अमान - ७० च्या दशकात आपल्या बोल्डनेसमुळे झीनत अमान विशेष चर्चेत राहिल्या होत्या. त्यांनी एकापेक्षा एक अनेक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले. त्याकाळी त्यांचा प्रचंड मोठा चाहतावर्ग होता. मात्र, खऱ्या आयुष्यात त्यांना अनेक कष्ट सहन करावे लागले.
झीनत अमान यांना त्यांच्या पतीने बऱ्याचदा मारहाण केली होती. इतकंच नाही तर संजय खान यांनी एका पार्टीत त्यांना सगळ्यांसमोर मारहाण केली. ज्यामुळे त्यांचा एक डोळा निकामी झाला. झीनत यांनी संजय खान यांच्यासोबत गुपचूप लग्न केल्याचं म्हटलं जातं. मात्र, हे नातं संपुष्टात आल्यानंतर त्यांनी मजहर खानसोबत लग्न केलं. परंतु, मजहरने देखील त्यांना असाच त्रास दिला.
रीना रॉय - रीना रॉय आणि शत्रूघ्न सिन्हा यांच्या नात्याची आजही चर्चा रंगत असते. एकेकाळी एकमेकांवर ही जोडी जिवापाड प्रेम करत होती. मात्र, शत्रूघ्न सिन्हा यांनी रीना यांना न कळवता पूनमसोबत लग्न केलं.
शत्रूघ्न सिन्हा यांनी फसवल्यानंतर एकट्या पडलेल्या रीनाने पाकिस्तानी क्रिकेटर मोहसीन खानसोबत लग्न केलं.
रेखा - बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांची लव्हलाइफ तर साऱ्यांनाच ठावूक आहे. बऱ्याचदा अमिताभ बच्चनसोबत त्यांचं नाव जोडलं गेलं. मात्र, या दोघांनीही त्यावर भाष्य करणं टाळलं.
रेखा यांनी मुकेश अग्रवाल यांच्यासोबत लग्न केलं होतं. मात्र, मुकेश यांनी आत्महत्या केली. या घटनेनंतर अनेकांनी रेखाला ट्रोल केलं होतं. परंतु, त्यानंतर आजपर्यंत रेखा एकट्याने आयुष्य जगत आहेत.
परवीन बाबी - परवीन बाबी यांना शेवटपर्यंत त्यांचं प्रेम मिळालं नाही असं म्हटलं जातं. अभिनेता डॅनी यांच्यासोबत त्यांचं नाव बऱ्याचदा जोडलं गेलं होतं. त्यानंतर कबीर बेदीसोबतही त्यांच्या नात्याची चर्चा झाली. इतकंच नाही तर महेश भट्ट यांनाही त्यांनी डेट केलं. मात्र, त्यांचं कोणतंच नातं फार काळ टिकलं नाही.
अखेरच्या दिवसात परवीन बाबी या गंभीर आजाराने ग्रस्त होत्या. त्या काळात त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाल्याचं सांगण्यात येतं.
जया बच्चन - अमिताभ बच्चन यांनी जया यांच्यासोबत लग्न केलं असलं तरीदेखील सुरुवातीच्या काळात त्यांच्या नात्यात बरेच चढउतार आल्याचं सांगण्यात येतं. बिग बी यशाचं शिखर चढत असतानाच त्यांचं नाव रेखासोबत जोडलं जात होतं. ज्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात ताणतणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
असं म्हटलं जातं, बिग बी आणि रेखा यांच्या नात्याची चर्चा रंगत असतानाच रागाच्या भरात जया यांनी रेखाच्या कानशिलात लगावली होती.