Rakhi Sawant : राखी सावंतचं मिसकॅरेज?; आदिल खानने अखेर मौन सोडलं, त्यामागील नेमकं सत्य सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 10:08 AM2023-01-19T10:08:31+5:302023-01-19T10:34:50+5:30

Rakhi Sawant And Adil Khan Durrani : राखी सावंत प्रेग्नंट असल्याचा दावा केला जात आहे. याच दरम्यान आता आदिलने पुढे येऊन राखीच्या गर्भपातामागचं नेमकं सत्य सांगितलं.

'बिग बॉस' फेम राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. नुकताच तिने दुसऱ्या लग्नाचा खुलासा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. राखीने दावा केला आहे की, तिने सात महिन्यांपूर्वी बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीसोबत निकाह केला आहे. तसेच हा निकाह देखील कायदेशीर करण्यात आला आहे.

राखीने आता तिच्या प्रेग्नेंसी आणि गर्भपाताची माहिती दिली आहे, जी ऐकून सगळेच अवाक् झाले आहेत. राखी सावंतने खुलासा केला आहे की ती गरोदर होती पण तिचा गर्भपात झाला होता. राखीचे म्हणणे आहे की, तिने मराठी बिग बॉसमध्येही याबद्दल सांगितले होते पण कोणीही तिच्यावर विश्वास ठेवला नाही.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये राखी सावंतचा फोटो हृदय तुटलेल्या इमोजीसह आहे. या पोस्टद्वारे असे सांगण्यात आले आहे की राखी सावंतसोबत त्यांचे संभाषण झाले आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीने तिचा गर्भपात झाल्याचा खुलासा केला आहे.

पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, 'हो भाऊ, मी प्रेग्नंट होते आणि मी बिग बॉस मराठी शोमध्येही याबद्दल सांगितले होते. परंतु प्रत्येकाला हा विनोद वाटला आणि कोणीही ते गांभीर्याने घेतले नाही.' पुढे राखी सावंतने सांगितले की, तिचा आता गर्भपात झाला आहे.

राखी सावंतने यापूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते की, ती जर आदिलसोबत राहिली नाही तर ती आपल्या मुलाला एकटेच वाढवेल. तेव्हापासून राखी सावंत प्रेग्नंट असल्याचा दावा केला जात होता. याच दरम्यान आता आदिलने पुढे येऊन राखीच्या गर्भपातामागचं नेमकं सत्य सांगितलं आहे.

आदिल खानने राखी सावंतच्या गर्भपाताच्या वृत्ताला पूर्णविराम देत ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचं म्हटलं आहे. तसे काहीही झालेले नाही. खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत. आदिलने त्याच्या आणि राखीच्या लग्नाचा फोटो शेअर करत लिहिले की, "फेक न्यूज आहे."

"मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की अशा विषयांवर कोणत्याही प्रकारच्या फेक न्यूज प्रकाशित करू नका." यासोबतच एक व्हिडीओ शेअर करताना राखी आणि आदिल या दोघांनीही अभिनेत्री गरोदर नव्हती किंवा तिचा गर्भपात झाला नसल्याचं म्हटलं आहे. ही गोष्ट पूर्णपणे खोटी आहे. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.

राखीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचे फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत. मी व आदिल आम्ही सात महिन्यांपूर्वीच लग्न केलं होत, मात्र आदिलने माझ्यावर हे लग्न लपवण्यासाठी दबाव टाकला. 'निकाह'सोबत आम्ही कोर्ट मॅरेजही केलं, मात्र आत्तापर्यंत हे सगळं जगापासून लपवून ठेवलं होतं, असा खुलासा केला आहे.

आदिलसोबत निकाह केल्यानंतर राखीने फातिमा असं नामकरण केलं आहे. पण आता आदिलने राखीसोबत बोलणं थांबवलं आहे. आदिलने मला धोका दिल्याचं राखी म्हणत आहे. राखीने लग्न केल्याची बातमी येताच, अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्यात. पण यानंतर एका मुलाखतीत राखीने वेगळंच काही सांगितलं.

ती म्हणाली, "आदिलने मला धोका दिला आहे. त्याचं दुसऱ्या मुलीसोबत अफेअर आहे. लग्नानंतरही तो दुसऱ्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. आदिलचं हे वागणं पाहूनच मी लग्नाबद्दल अख्ख्या जगाला सांगितलं. लग्नानंतर मी माझं नावही बदललं आहे. निकाहनंतर मी माझं नाव फातिमा ठेवलं आहे."

"लग्नाबद्दल लोकांना कळताच आता आदिल माझ्याशी बोलत नाहीये. त्याच्या व त्याच्या कुटुंबाकडून माझ्यावर दबाव टाकला जात आहे". पुढे ती म्हणाली, बहिणीचं लग्न होईपर्यंत आपलं लग्न लपवून ठेव, असं आदिल मला म्हणाला होता. मी त्याच्यावर विश्वास ठेवला. मी ‘बिग बॉस मराठी 4 ’ मध्ये गेल्यावर बाहेर अनेक गोष्टी घडल्या. मग मात्र माझा संयम संपला आणि मी लग्नाबद्दल खुलासा केला.

राखी अलीकडे ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात सहभागी झाली होती. घरातील टॉप 5 सदस्यांमध्ये राखीने स्थान मिळवलं होतं. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच राखी व तिचा बॉयफ्रेंड आदिल खानच्या लग्नाचे फोटो व्हायरल झालेत. राखीने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिच्या लग्नाचा व्हिडीओ शेअर केला आहे.