राणादा आणि पाठकबाईंची लगीन घाई! अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीच्या लग्नाची पत्रिका आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 05:48 PM2022-11-05T17:48:18+5:302022-11-05T17:52:47+5:30

Akshaya Deodhar And Hardik Joshi Wedding : अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांच्या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे.

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील राणादा व पाठकबाई अर्थात अभिनेता हार्दिक जोशी ( Hardeek Joshi ) व अक्षया देवधर (Akshaya Deodhar ) हे दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत.

काही महिन्यांपूर्वी साखरपुड्याचे फोटो शेअर करत या दोघांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो पाहून त्यांच्या चाहत्यांना आनंद तर झाला होता पण आश्चर्याचा धक्कादेखील बसला होता.

आता ते लवकरच दोघे लग्नबेडीत अडकणार आहेत. ते सोशल मीडियावर बऱ्याचदा व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतात. दरम्यान अक्षयाने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांच्या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. त्यांच्या केळवणाचे फोटोदेखील सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

तसेच नुकतेच पुण्यात साडी विणणाऱ्या एका नामांकित कंपनीत अक्षयाच्या लग्नाची साडी विणायला घेतली गेली. या विधीला वधू-वरांकडील निवडक मंडळी उपस्थित होते.

अक्षया आणि हार्दिक यांचे लग्न पुण्यात होणार आहे. परंतु लग्नाची तारीख मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

दरम्यान आता अक्षया देवधरने सोशल मीडियावर लग्नाची पत्रिका शेअर केली आहे. खरेतर ही पत्रिका अक्षयाने नाही तर रुचा आपटेने शेअर केली आहे.

अक्षया आणि हार्दिक यांच्या लग्नाची पत्रिका पाहून चाहते त्यांच्या लग्नाबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.

अक्षया आणि हार्दिक यांचा ठाण्यात ३ मे रोजी साखरपुडा केला होता. या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिला होता.

तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते.