Ranbir kapoor alia bhatt new year vacation photos
PICS: लग्नाच्या चर्चेदरम्यान Ranbir Kapoor Alia Bhatt सीक्रेट डेस्टिनेशवर New Year सेलिब्रेट करायला गेले By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 12:52 PM2021-12-29T12:52:51+5:302021-12-29T13:29:35+5:30Join usJoin usNext नवीन वर्ष सुरु होण्यासाठी अवघे 3 दिवस बाकी आहेत. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी बॉलिवूड सेलेब्स आपल्या आवडत्या ठिकाणी सेलिब्रेशनसाठी गेले आहेत.सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी मुंबई विमानतळावर स्पॉट झाले होते. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी दोघेही मालदीवमध्ये पोहोचले आहेत. मंगळवारी रात्री बॉलीवूडमधील क्युट कपलपैकी एक, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट (Ranbir Kapoor Alia Bhatt Vacation) देखील मुंबई विमानतळावर स्पॉट झाले. . (फोटो क्रेडिट्स: विरल भयानी) दोघेही न्यू इअरचे सेलिब्रेशन करणार आहेत. मात्र, दोघे कोणत्या डेस्टिनेशनवर नव्या वर्षाचे स्वागत करणार आहेत, याचा खुलासा झालेला नाही.. (फोटो क्रेडिट्स: विरल भयानी) रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुंबई विमानतळावर दिसले. एअरपोर्ट लुकसाठी रणबीर-आलियाने कॅज्युअल आणि कम्फर्टेबल आउटफिट्स निवडले. दोन्ही कलाकार या आउटफिट्समध्ये खूप छान दिसत आहेत. (फोटो क्रेडिट्स: विरल भयानी) फोटोंमध्ये आपण पाहू शकतो की आलिया भट्टने ऑलिव्ह हिरव्या रंगाच्या टी वर त्याच रंगाचा ट्रेंच कोट घातला होता, जी तिने ट्राउझर्ससोबत पेअर केला आहे. (फोटो क्रेडिट्स: विरल भयानी) रणबीर आणि आलिया मालदीवमध्ये नवीन वर्ष साजरे करणार असल्याचे चाहत्यांना वाटते. आजकाल अक्षय कुमार-ट्विंकल खन्ना, हृतिक रोशन, टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतायेत. (फोटो क्रेडिट्स: Instagram @aliaabhatt) वर्क फ्रंटवरबाबत बोलायचे झाले तर, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' मध्ये दिसणार आहेत, जो 9 सप्टेंबर 2022 रोजी रिलीज होणार आहे. हे दोन लव्ह बर्ड्स पहिल्यांदाच एकत्र स्क्रिनवर दिसणार आहेत. (फोटो क्रेडिट्स: विरल भयानी)टॅग्स :रणबीर कपूरआलिया भटRanbir KapoorAlia Bhat