IN PICS : रणदीप हुड्डाने दिली प्रेमाची कबुली, जाणून घ्या कोण आहे त्याची ‘लेडी लव्ह’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 03:26 PM2022-10-28T15:26:54+5:302022-10-28T15:32:28+5:30

Randeep Hooda Confirms Relationship : रणदीप मणिपुरी मॉडेल लिन लॅशराम हिला डेट करतोय. दिवाळीच्या मुहूर्तावर रणदीपने लिनसोबत फोटो शेअर करत, आपलं नात जगजाहिर केलं...

मान्सून वेडिंग, सरबजीत ते लाल रंग यासारख्या अनेक चित्रपटात झळकलेला अभिनेता रणदीप हुड्डा प्रेमात आहे. होय, अखेर त्यानं आपलं नातं ऑफिशिअल केलं आहे.

रणदीप मणिपुरी मॉडेल लिन लॅशराम हिला डेट करतोय. दिवाळीच्या मुहूर्तावर रणदीपने लिनसोबत फोटो शेअर करत, आपलं नात जगजाहिर केलं. या फोटोत रणदीप व लॅश दोघंही दिव्यांसह पोझ देताना दिसत आहेत.

2001 मध्ये ‘मान्सून वेडिंग’ या चित्रपटाद्वारे रणदीपने आपल्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरूवात केली होती. पण यानंतर सलग चार वर्षे रणदीपला कुणीही काम देईना. यानंतर 2005 मध्ये रामगोपाल वर्मा यांनी त्याला आपल्या ‘डी’ चित्रपटासाठी साइन केलं आणि यानंतर रणदीपने कधीच मागे वळून पाहिले नाही.

सुश्मिता सेन, नीतू चंद्रा, अदिती राव हैदरी, चित्रांगदा सिंग अशा अनेक अभिनेत्रींशी रणदीप हुड्डाचं नाव जोडले गेले. अर्थात रणदीप आजही अविवाहित आहे. पण आता मात्र लग्नाची वेळ आलीय. होय, रणदीप लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा आहे.

2016 पासून रणदीप लिनला डेट करतोय. चार वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असलेल्या या कपलने आता लग्नाचा निर्णय घेतल्याचे कळतंय.

रणदीपची गर्लफे्रन्ड लिन ही मणिपुरी अभिनेत्री आहे. 2014 मध्ये एका बॉलिवूड सिनेमातही ती झळकली होती. होय, प्रियंका चोप्राच्या ‘मेरी कॉम’ या सिनेमात तिने काम केलं होतं. याशिवाय लिन ही नॅशनल लेव्हल आर्चरही आहे.

शाहरूख खान स्टारर ओम शांती ओम या चित्रपटात तिने कॅमिओ केला होता. याशिवाय रंगून आणि उमरिका या सिनेमातही ती झळकली होती.

नशीरूद्दीन शाह यांच्या थिएटर ग्रूपमध्ये तिने अनेक वर्षे काम केलं. 2018 मध्ये नवी दिल्लीच्या त्यागराज स्टेडियममध्ये रणदीप व लिन यांना पहिल्यांदा एकत्र पाहिले गेलं होतं. यानंतर दोघांच्या लव्हलाईफच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

लिन एक बिझनेस वुमनही आहे. तिचा ज्वेलरीचा बिझनेस आहे. चर्चा खरी मानाल तर रणदीप व लिन दोघंही लिव्हइनमध्ये राहत आहेत.