Rani Chatterjee files harassment case against 60 year old man see pics
अभिनेत्री राणी चॅटर्जीने मुंबई पोलिसांचे मानले आभार, या व्यक्तीच्या विरोधात केली तक्रार दाखल By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 06:04 PM2020-07-07T18:04:16+5:302020-07-07T18:04:16+5:30Join usJoin usNext भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जीने नुकतेच डिप्रेशनबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट शेअर करून राणी चॅटर्जीने चाहत्यांना धक्का दिला होता. सोशल मीडियावर राणी चॅटर्जीने धनंजय सिंग नामक व्यक्तीला डिप्रेशनसाठी जबाबदार ठरविले होते. राणी चॅटर्जीने लिहिले की, हा व्यक्ती कित्येक वर्षांपासून माझ्याबद्दल घाणेरड्या गोष्टी फेसबुकवर लिहत आहे. मी खूप दुर्लक्ष करण्याचा खूप प्रयत्न केला. बऱ्याच लोकांशी बोलले. सगळ्यांनी सांगितले की दुर्लक्ष कर. मी पण माणूसच आहे. तिने पुढे लिहिले की यामुळे मी मानसिक दबावातून जात होते. पुढे तिने लिहिले की कदाचित त्याला मी जीव द्यावा असे वाटत असेल. या व्यक्तीमुळे माझे जीवन खूप तणावात आहे. तिने मुंबई पोलिसांना विनंती केली की जर मी काही बरे वाईट केले तर त्यासाठी धनंजय सिंग जबाबदार असेल.टॅग्स :मुंबई पोलीसMumbai police