DEEPVEER : रब ने बना दी जोडी! एका KISSने सुरू झाली होती रणवीर-दीपिकाची लव्हस्टोरी...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 11:40 AM2022-11-14T11:40:21+5:302022-11-14T11:52:16+5:30

Ranveer Singh-Deepika Padukone 4th Wedding Anniversary: 2018 साली आजच्याच दिवशी म्हणजे 14 नोव्हेंबरला दोघांनी इटलीच्या लेक कोमा येथे लग्नगाठ बांधली होती.

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण हे बॉलिवूडच्या पॉवर कपल्सपैकी एक कपल. दोघांचेही जगभर चाहते आहेत. रिल लाईफमध्येचं नाही तर रिअल लाईफमध्येही ही जोडी चाहत्यांना भावतं. आज या जोडप्याच्या लग्नाला 4 वर्षे पूर्ण झालीत.

होय, 2018 साली आजच्याच दिवशी म्हणजे 14 नोव्हेंबरला दोघांनी इटलीच्या लेक कोमा येथे लग्नगाठ बांधली होती. या लग्नाची जोरदार चर्चा झाली होती.

गेल्या काही दिवसांपासून दीपिका व रणवीर यांच्यात बिनसल्याची चर्चा होती. दोघंही घटस्फोट घेणार, इथपर्यंत चर्चा ऐकायला मिळाल्या होत्या. पण या सगळ्या अफवा असल्याचं दीपवीर दोघांनीही स्पष्ट केलं.

आज हे कपल लग्नाचा चौथा वाढदिवस साजरा करत आहे. या कपलची लव्हस्टोरी फारच इंटरेस्टिंग आहे. होय, एका ‘किस’ने ही लव्हस्टोरी सुरू झाली होती.

तर ही लव्हस्टोरी सुरू झाली होती ‘रासलीला-रामलीला’च्या सेटवर. खरं तर सेटवरचं दोघांचंही वागणं पाहून दोघांत काहीतरी खिचडी शिजतेय, अशी शंका सर्वांनाच आली होती. पण तसं काहीही कन्फर्म नव्हतं.

चित्रपटातील ‘अंग लगा रे’ या गाण्याच्या शूटींगवेळी असं काही घडलं की, दोघंही एकमेकांच्या प्रेमात आहेत, हे अखेर सिद्ध झालं.

‘अंग लगा रे’ या गाण्याच्या अखेरीस रणवीर आणि दीपिकाचा एक किसिंग सीन होता आणि या गाण्याचं शूट सुरू होतं. सीन संपला तसं दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी कट म्हटलं. पण दिग्दर्शकांनी कट म्हटल्यानंतरही रणवीर- दीपिका एकमेकांना किस करत राहिले.

सेटवर 50 लोकांचं युनिट होतं. पण दीपिका व रणवीर मात्र एकमेकात मश्गुल होतं. इतकं की, भन्साळींनी कट म्हटल्यावर दोघं एकमेकांना किस करत राहिले. त्यांच्या अशा वागण्यानं सर्वच हैराण झाले. त्याचवेळी हे दोघं एकमेकांच्या प्रेमात असल्याचं कन्फर्म झालं.

‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाच्या शूटिंगवेळी मात्र दीपवीर प्रेमात असल्याचं पूर्णपणे स्पष्ट झालं. दीपिकाला घेतल्याशिवाय रणवीर सेटवरून बाहेर पडत नसे.

2012 साली दीपिका व रणवीर पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. मकाऊमध्ये एका अवार्ड शोमध्ये रणवीरने पहिल्यांदा दीपिकाला पाहिलं होतं आणि पहिल्याच नजरेत तो दीपिकावर भाळला होता.