शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरचे मॉडर्न फोटो पाहून अण्णाच काय तुम्ही पण पडाल प्रेमात,See Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 08:00 IST2020-07-02T08:00:00+5:302020-07-02T08:00:01+5:30
अपूर्वा नेमळेकरचे मॉडर्न लूकमधील फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.

शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकर सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो व व्हिडिओ शेअर करत असते.
अपूर्वाने मॉडर्न गेटअपमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अपूर्वाचा मॉर्डन अवतारा बघून तिचे चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत. तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ही शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे.
या मालिकेतून लोकप्रियता मिळाल्यानंतर अपूर्वाच्या चाहत्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे.
२७ डिसेंबर १९८८ रोजी मुंबईच्या दादर येथे जन्मलेल्या अपूर्वाने किंग जॉज विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले.
यानंतर नॅशनल कॉलेज वांद्रे आणि रूपारेल कॉलेजात तिचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले.
कॉलेजमध्ये असतानाच अपूर्वाला अॅक्टिंगच्या ऑफर येणे सुरु झाले होते.
पण अपूर्वाने या सगळ्या ऑफर धुडकावल्या होत्या. याचे कारण म्हणजे, अभिनयात तिला कुठलाही रस नव्हता.
खरे तर तिला एमबीए करायचे होते. पण अपूर्वाच्या आई-वडिलांची मात्र मुलीने अभिनयात जावे अशी इच्छा होती.
नियतीने त्यांची ही इच्छा पूर्ण केली. कदाचित त्यामुळेच, अभिनय क्षेत्रात काम करणे हे माझ्या नशिबातच लिहिले होते, असे अपूर्वा नेहमी म्हणते.
अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे.
तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली.