PHOTOS : ‘मस्त मस्त गर्ल’ रवीना टंडनच्या लेकीचे हे फोटो पाहिलेत का? तिच्यापुढे सारा, जान्हवीही फिक्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 12:18 PM2022-12-26T12:18:03+5:302022-12-26T12:25:28+5:30

Raveena Tandon daughter Rasha Thadani : होय, रवीनाची लेक राशा थडानी सध्या जाम चर्चेत आहेत. तिचे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहेत.

रवीना टंडन बॉलिवूडमध्ये आली आणि नव्वदीचा काळ रवीनाने अक्षरश: गाजवला होता. आजही रवीना टंडनचा चाहता वर्ग तितकाच मोठा आहे. पण सध्या चर्चा ‘मस्त मस्त गर्ल’ची नाही तर तिची लेक राशाची आहे...

होय, रवीनाची लेक राशा थडानी सध्या जाम चर्चेत आहेत. तिचे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहेत.

राशा आता बरीच मोठी झाली आहे आणि अनन्या पांडे, जान्हवी कपूर, खुशी कपूर, न्यासा देवगण या स्टारकिड्स सारखीच तिचीही चर्चा होताना दिसतेय.

राशाची आई रवीना सुंदर आहेच. पण राशाही आई इतकीच सुंदर आहे. चाहते तिच्या सौंदर्यावर फिदा आहेत.

राशाची स्टाइल आणि अदा पाहून ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल असं वाटत आहे. सध्या जिकडे तिकडे राशाच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा सुरू आहे.

राशा बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार का? यावर अलीकडे रवीना बोलली होती. सध्या तरी तिचा असा कोणताच प्लॅन नसल्याचं ती म्हणाली होती.

राशाने बॉलिवूडमध्ये यावं का? आई म्हणून तुला काय वाटतं? असं विचारल्यावर, मला असं अजिबात वाटत नाही. पण आजकालची मुलं स्वत:चे निर्णय स्वत:ल घेतात. हे तिचं आयुष्य आहे त्यामुळे तिने तिची स्वप्न पूर्ण करावी, असं रवीना म्हणाली होती.

रवीनाची ग्लॅमरस लेक राशा सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. स्वत:चे ग्लॅमरस फोटो ती शेअर करत असते.

राशा नुकतीच 17 वर्षांची झाली. बॉलिवूडमधल्या अनेक स्टारकिड्सप्रमाणेच तिने मुंबईतील धीरुबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतलं.

2004 मध्ये रवीनानं अनिल थडानीसोबत लग्न केलं आणि 2005 मध्ये तिनं राशाला जन्म दिला. वयाच्या 21 व्या वर्षी म्हणजे 1995 मध्ये रवीनाने दोन मुलींना दत्तक घेतलं होतं.