Photos: ऊई अम्मा छुई मुई सी हिरनिया... रवीना टंडनची लेक राशा थडानीचा स्टायलिश लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 17:05 IST2025-01-09T16:57:58+5:302025-01-09T17:05:17+5:30

अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी सध्या तिच्या आगामी 'आझाद' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात राशा अजय देवगण आणि त्याचा पुतण्या अमन देवगणसोबत झळकण्यास सज्ज झाली आहे.
या सिनेमातील 'ऊई अम्मा' हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. या आयटम साँगमधील राशाच्या डान्स मूव्ह्स प्रेक्षकांना वेड लावले आहे.
सध्या तिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. यामध्ये भलतीच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसतेय.
या लूकमध्ये लाल रंगाचा ड्रेस तिनं परिधान केला आहे. तिच्यावर हा ड्रेस अतिशय सुंदर आणि हॉट दिसत आहे.
यावर बोल्ड आयलायनर, भरीव काजल आणि सोबतच न्यूड लिपस्टिक असा आकर्षित लुक तिने केला आहे.
या फोटोमध्ये राशाने आपले केस मोकळे सोडले आहे. जे चाहत्यांना घायाळ करत आहेत.
राशाचे हे हॉट आणि सेन्सेशनल फोटोशूट व्हायरल झालं आहे.
राशा अवघ्या 19 व्या वर्षीच पदार्पण करत असून सिनेमा रिलीजआधीच तिची क्रेझ दिसत आहे.
राशाचा पहिला चित्रपट 'आझाद' हा येत्या 17 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
'आझाद' चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कपूरने केले आहे. हा एक ॲक्शन-ॲडव्हेंचर चित्रपट आहे.