Raveena tandon shares about her journey of being a grand mother at the age of 46
म्हणून ४६व्या वर्षी आजी झाली मस्त मस्त गर्ल रवीना टंडन, सांगितले या मागचे खरे कारण By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 12:14 PM2021-05-17T12:14:29+5:302021-05-17T12:40:30+5:30Join usJoin usNext बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने तिच्या चित्रपट कारकिर्दीत अनेक हिट चित्रपटांत काम केले आहे. रवीनाने तिच्या आयुष्यातील स्टारडम पाहिले जे प्रत्येक अभिनेत्रीचे स्वप्न असते. यासह रवीनानेही आपल्या कारकीर्दीच्या शिखरावर दोन मुलींना दत्तक घेतले. . (Photo Instagram) रवीनाने अवघ्या 21 व्या वर्षी दोन मुलींना दत्तक घेतले होते. आता ती आजीसुद्धा झाली आहे. चाहत्यांनी बर्याचदा रवीनाला फक्त 46 वर्षांच्या वयात आजी होण्याविषयी विचारणा केली. . (Photo Instagram) आता रवीना टंडन मिस मालिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, 'हा शब्द जेव्हा येतो तेव्हा लोकांना वाटते की तुम्ही 70-80 वर्षांचे असाल. जेव्हा मी माझ्या मोठ्या मुलीला दत्तक घेतले तेव्हा मी फक्त 21 वर्षांची होती आणि ती 11 वर्षांची होती. ' . (Photo Instagram) रवीना टंडन म्हणाली, 'खऱं तर आमच्यात 11 वर्षांचा फरक आहे. ती आता एका मुलाची आई झाली आहे. आम्ही दोघे एकमेंकीसोबत मैत्रिणीसारख्या असतो पण दुसरीकडे मी तिची आईदेखील आहे. त्यामुळे अशा पद्धतीने मी आजी झाली. . (Photo Instagram) 22 फेब्रुवारी 2004 रोजी रवीनाने फिल्म डिस्ट्रीब्युटर अनिल थडानीसेबत लग्न केले. या दोघांना 14 वर्षांची मुलगी राशा आणि 11 वर्षांचा मुलगा आहे. (Photo Instagram) रवीनाने तिच्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवला आहे. (Photo Instagram) तिने अनेक हिट चित्रपट दिले असून तिच्या अभिनयासाठी तिला अनेक पुरस्काराने देखील गौरवण्यात आले आहे. (Photo Instagram) मोहरा, लाडला, दिलवाले, अंदाज अपना अपना यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने एकापेक्षा एक सरस भूमिका साकारल्या. (Photo Instagram) ‘मोहरा’ हा तिचा चित्रपट सुपरहिट ठरला. यातील ‘तू चीज बडी है मस्त मस्त...’ हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले. याच गाण्यामुळे बॉलिवूडची 'मस्त मस्त गर्ल' म्हणून रवीना ओळखली जाऊ लागली. (Photo Instagram) रवीना लकरच सुपरस्टार यशसोबत ‘केजीएफ- चॅप्टर 2’ या सिनेमात झळकणार आहे. (Photo Instagram)Read in Englishटॅग्स :रवीना टंडनRaveena Tandon