पहिल्या पत्नीवर होतं फरहान अख्तरचं जीवापाड प्रेम; डिनो मोरियाच्या भावामुळे मोडला सुखाचा संसार? By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 01:32 PM 2021-12-01T13:32:02+5:30 2021-12-01T13:40:03+5:30
Farhan Akhtar: शिबानीला डेट करण्यापूर्वी फरहानने अधुना भबानीसोबत (Adhuna Bhabani) संसार थाटला होता. मात्र, २०१७ मध्ये या दोघांनी १९ वर्षांचा संसार मोडला आणि ते विभक्त झाले. दिग्दर्शक, गायक, अभिनेता अशा विविधांगी भूमिका साकारत कायम प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेला बॉलिवूड स्टार म्हणजे फरहान अख्तर (Farhan Akhtar) . सोशल मीडियावर सक्रीय असलेला फरहान त्याच्या प्रोफेशन लाइफसोबत पर्सनल लाइफमुळेही चर्चेत असतो.
२०१८ पासून फरहान अभिनेत्री शिबानी दांडेकरला (Shibani Dandekar) डेट करत आहे. विशेष म्हणजे या जोडीची सोशल मीडियावर कायमच चर्चा रंगत असते. आज कलाविश्वातील बहुचर्चित कपल म्हणून या जोडीकडे पाहिलं जातं.
सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत फरहान-शिबानीची कायम चर्चा रंगत असते. मात्र, फरहानच्या पहिल्या पत्नीविषयी फार कमी जणांना माहित आहे.
शिबानीला डेट करण्यापूर्वी फरहानने अधुना भबानीसोबत (Adhuna Bhabani) संसार थाटला होता. मात्र, २०१७ मध्ये या दोघांनी १९ वर्षांचा संसार मोडला आणि ते विभक्त झाले.
अधुना ही कलाविश्वातील लोकप्रिय सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट असून बी ब्लंट या सॅलॉनची ओनर आहे.
फरहान आणि अधुनाचं लव्हमॅरेज होतं. या अधुनाही फरहानपेक्षा ६ वर्षांनी मोठी असल्याचं सांगण्यात येत. १९९७ मध्ये एका नाईट क्लबमध्ये या दोघांची पहिली भेट झाली होती. या भेटीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी 2000 मध्ये लग्नगाठ बांधली.
फरहानचं अधुनावर प्रचंड प्रेम होतं. त्यामुळे तिच्या ४० व्या वाढदिवशी त्याने हिऱ्याची अंगठी तिला गिफ्ट केली होती. परंतु, लग्नाच्या काही वर्षांनंतर या दोघांच्या नात्यात दुरावा आला.
२०१७ मध्ये या दोघांनी वांद्र्याच्या फॅमिली कोर्टात कायदेशीरित्या घटस्फोट घेतला. सूत्रांच्या माहितीनुसार, अधुनाच्या आयुष्यात निकोलो मोरियाची एन्ट्री झाल्यामुळे त्यांच्या संसारात फूट पडली.
अधुना, निकोला मोरियाला डेट करत असल्यामुळे फरहानने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येतं.
निकोल मोरिया हा अभिनेता डिनो मोरियाचा भाऊ आहे.