Rekha Birthday Special : '....म्हणून अमिताभ बच्चन माझ्यावरील प्रेम लपवतात', रेखा यांनी सांगितलं होतं याचं कारण! By अमित इंगोले | Published: October 10, 2020 01:07 PM 2020-10-10T13:07:39+5:30 2020-10-10T13:19:27+5:30
रेखा यांची अमिताभ बच्चनसोबतची जोडी सर्वात जास्त हिट राहिली. त्यांच्या ऑफ स्क्रीन जवळीकतेची सर्वात जास्त चर्चा तेव्हाही झाली आणि आजही होते. आजही लोकांना त्यांच्या किस्स्यांबाबत ऐकायला आवडतं. बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांचा आज वाढदिवस. आज त्या ६६ वर्षांच्या झाल्या. पण या वयातही त्यांचं सौंदर्य तरूणींना लाजवेल असंच आहे. आजही त्या अनेकांच्या मनावर राज्य करतात. त्यांनी १९७० मध्ये 'सावन भादो' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. त्यानंतर नमक हराम, नागिण, जानी दुश्मन, सिलसिला, इजाजत, उमराव जान, खून भरी मांग, जुबैदा अशा कितीतरी सिनेमात आपल्या अदाकारी सर्वांना मंत्रमुग्ध केलं. रेखा यांची अमिताभ बच्चनसोबतची जोडी सर्वात जास्त हिट राहिली. त्यांच्या ऑफ स्क्रीन जवळीकतेची सर्वात जास्त चर्चा तेव्हाही झाली आणि आजही होते. आजही लोकांना त्यांच्या किस्स्यांबाबत ऐकायला आवडतं.
अमिताभसमोर विसरत होत्या डायलॉग - एका मुलाखतीत रेखा यांनी सांगितले होते की, अमिताभ बच्चन समोर उभं राहणं सोपं नाही. अमिताभ बच्चन यांचं कौतुक करत त्यांनी सांगितले होते की, त्यांच्यासोबत पहिला सिनेमा करताना त्यांना बघून त्या त्यांचे डायलॉग विसरायच्या.
जया बच्चन यांनी घडवून आणली होती भेट - मीडिया रिपोर्ट्सनुसार, जया आणि रेखा त्यावेळी एकाच बिल्डींगमध्ये राहत होत्या. दोघी खूप चांगल्या मैत्रीणी होत्या. रेखा जया यांना दीदी म्हणून हाक मारायची. जया त्यावेळी अमिताभ बच्चन यांना डेट करत होत्या. जया यांनीच रेखाची अमिताभ बच्चन यांच्याशी भेट करून दिली होती.
सगळीकडे रंगली होती दोघांच्या नात्याची चर्चा - एक काळ असा होता की, रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रेमाच्या चर्चा सगळीकडे रंगल्या होत्या. जया बच्चन यामुळे फार चिंतेत होत्या. अमिताभ बच्चन यांच्यावरील प्रेम रेखा नेहमी व्यक्त करत होत्या. तर अमिताभ नेहमी यावर मौन बाळगून असायचे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जया बच्चन यांनी या बातम्या फार चांगल्या प्रकारे हॅंडल केल्या.
अशा गेल्या होत्या ऋषी कपूरच्या लग्नात - नीतू सिंह आणि ऋषी कपूर यांच्या लग्नात जया आणि अमिताभ सोबत पोहोचले होते. त्यानंतर रेखा आल्या होत्या. त्यांनी सुंदर साडी नेसली होती आणि कपाळावर टिकली लावली होती. पण एका आणखी गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ती म्हणजे रेखा यांनी भांगेत कुंकू भरलं होतं. सर्वांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते.
रेखा यांनी सांगितलं होतं कारण - यावरून रेखा यांना प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी उत्तर दिलं होतं की, त्या शूटींगवरून थेट तिथे आल्या होत्या. ज्यामुळे भांगेत कुंकू तसंच राहिलं. रेखा आजही भांगेत कुंकू लावतात आणि त्या सांगतात की, त्यांच्या शहरात असं करणं फॅशन आहे.
१९८४ मध्ये फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत रेखा अमिताभ यांच्यासोबतच्या नात्याबाबत मोकळेपणाने बोलल्या होत्या. अमिताभ बच्चन यांनी रेखा यांच्यासोबत नातं असल्याचं कधीही मान्य केलं नाही. पण रेखा नेहमी खुलेपणाने प्रेम व्यक्त करायच्या. पण रेखा म्हणाल्या होत्या की, त्यांनी(अमिताभ) असं करू नये? त्यांनी हे आपल्या परिवाराला आणि आपल्या मुलांना प्रोटेक्ट करण्यासाठी केलं. मला हे फार सुंदर वाटतं. मला काळजी नाही की, लोक काय विचार करतात. लोकांना त्यांच्या माझ्यावरील आणि माझ्या त्यांच्यावरील प्रेमाची माहिती का हवी? माझं त्यांच्यावर प्रेम आहे आणि त्यांचं माझ्यावर बस्स'.
पत्नीला हर्ट करू शकत नाही अमिताभ - रेखा असंही म्हणाल्या होत्या की, जर त्यांनी खाजगीत अशी रिअॅक्शन दिली असतील तर मी निराश झाले असते. पण त्यांनी असं केलं का? मग काय फरक पडतो, ते पब्लिकमध्ये काय म्हणाले. मिस्टर बच्चन हे जुन्या विचारांचे आहेत. त्यांना कुणालाही हर्ट करायचं नाही. तर पत्नीला का करतील?