"थोडा वेळ आराम केला अन्...", नितीन देसाईंच्या मित्रानं सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं? By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 11:29 AM 2023-08-03T11:29:15+5:30 2023-08-03T11:35:45+5:30
Nitin Chandrakant Desai : कलाविश्वातील प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येच्या वृत्ताने सर्वांना धक्का बसला आहे. वयाच्या ५७व्या वर्षी त्यांनी आत्महत्या केली. त्यांनी इतक्या टोकाचं पाऊल का उचललं असेल, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. कलाविश्वातील प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येच्या वृत्ताने सर्वांना धक्का बसला आहे. वयाच्या ५७व्या वर्षी त्यांनी आत्महत्या केली. त्यांनी इतक्या टोकाचं पाऊल का उचललं असेल, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
हैराण करणारी बाब ही आहे की, नितीन देसाई यांनी त्यांच्याच कर्जत येथील एन डी स्टुडिओत आत्महत्या केली. असं सांगितलं जात आहे की, कला दिग्दर्शकाने आर्थिक संकटात अडकले होते आणि याला कंटाळून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं.
नितीन देसाई यांनी जेव्हा आत्महत्या केली तेव्हा स्टुडिओत त्यांच्यासोबत त्यांचा मित्र दिलीप पिथवा उपस्थित होते. त्यांनी १ ऑगस्टच्या रात्री काय घडले, याबद्दल सांगितले.
ईटाइम्सशी बोलताना दिलीप म्हणाले की, आम्ही दोघे दिल्लीहून मुंबईत आलो आणि तिथून स्टुडीओत आलो. त्यांनी त्यांच्या अटेंडेंटला सांगितले की, बंगला खोल कारण त्यांना काही काळ आराम करायचा होता.
नितीन देसाईंनी काही काळ आराम केल्यानंतर ते म्हणाले की, त्यांना काहीतरी काम आहे आणि ते दुसऱ्या मजल्यावर गेले. तिथे जाऊन त्यांनी आत्महत्या केली. ते आर्थिक अडचणीत होते. मात्र त्यांनी आम्हाला कधीच सांगितले नव्हते की त्यांनी त्यांचे पवई ऑफिसदेखील विकलं.
दिलीप फक्त नितीन देसाईंचा मित्रच नाही तर त्या दोघांनी जोश, मेला, देवदास, हम दिल दे चुक सनममध्ये एकत्र काम केले होते.
रायगडच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, सेटवर काम करणाऱ्या वर्करने याबद्दल पोलिसांना माहिती दिली होती. जेव्हा आम्ही सेटवर पोहचलो तेव्हा नितीन देसाईंची बॉडी लटकलेल्या अवस्थेत होती. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत.
ज्या एनडी स्टुडिओत नितीन देसाईंनी आत्महत्या केली त्याचे ते क्रिएटर आणि संस्थापक होते. एनडी स्टुडिओत बऱ्याच चित्रपट आणि मालिकांचं शूटिंग पार पडलं आहे.
यात जोश, मेला, मिशन काश्मीर, हम दिल दे चुके सनम, सलमान बॉम्बे, मुन्नाभाई एम.बी.बी.एस, स्वदेस, प्रेम रतन धन पायोचा समावेश आहे.