"कधीकधी फक्त गप्प राहणं..." 'ते' फोटो शेअर करत रिंकू राजगुरूची लक्षवेधी पोस्ट, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 13:16 IST2025-04-18T13:06:15+5:302025-04-18T13:16:18+5:30

रिंकू राजगुरूच्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोंची आणि त्यावर दिलेल्या कॅप्शनची सध्या चर्चा रंगली आहे.

मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरूने (Rinku Rajguru) अभिनय कौशल्याने कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. 'सैराट' (Sairat)हा रिंकूचा पहिला सिनेमा. पण पहिल्याच सिनेमानं तिला स्टार केलं.

'सैराट'नंतर रिंकू अनेक सिनेमात दिसली आहे. तिनं अभिनय क्षेत्रात स्वता:ला सिद्ध केलं आहे. रिंकू सध्या अभिनयात आणि सौंदर्यात अनेक दिग्गज अभिनेत्रींना मात देत आहे.

रिंकू अनेकांच्या गळ्यातला ताईत झालीय. तिच्या सोशल मीडियावरच्या पोस्टसाठी चाहते प्रतीक्षा करत असतात.

नुकतंच रिंकूनं आपल्या इन्स्टाग्रामवर नवे फोटो (Rinku Rajguru Latest Photos) शेअर केले आहेत. रिंकू त्यात सिंपल ब्लॅक अँड व्हाईट लूकमध्ये (Rinku Rajguru In Black And White Look) दिसते आहे.

रिंकून पांढऱ्या रंगाची जिन्स परिधान केली आहे. त्याव तिनं काळ्या रंगाचं शर्ट घातलं आहे. तर केस बांधले असून यात ती सुंदर दिसतेय.

या फोटोंसोबत रिंकूनं कॅप्शनमध्ये "कधीकधी फक्त गप्प राहणं आणि हसणं चांगलं असतं", असं लिहलं.

सोफ्याजवळ बसलेल्या रिंकूचं हे शांत आणि हसरं रूप चाहत्यांना आवडलं आहे.

यावर तिच्या चाहत्यांच्या प्रचंड प्रतिक्रिया आल्या आहेत. नेटकऱ्यांनी तू खूप सुंदर दिसतेस असं म्हटलंय.

शिवाय तिच्या या फोटोंवर अभिनेत्री अमृता खानविलकर आणि प्रार्थना बेहरे यांनीही हार्ट इमोजी पोस्ट केल्यात.

रिंकूच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिच्या 'आशा' या सिनेमाची 'थर्ड आय एशियन चित्रपट महोत्सवात' निवड झाली होती. तिनं या सिनेमात आशा सेविकेची भूमिका साकारली आहे. याशिवाय रिंकू लवकरच 'जिजाई' या चित्रपटात दिसणार आहे. तिच्या आगामी सिनेमांची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.