Riteish-Genelia : 'मी लग्न करेन पण…', जिनिलियानं रितेश देशमुखला लग्नाआधी घातली होती 'ही' अट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 07:00 AM2023-01-06T07:00:00+5:302023-01-06T07:00:00+5:30

Riteish Deshmukh-Genelia D'souza-Deshmukh:अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख ही सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी सध्या चर्चेत आली आहे.

अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख ही सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी सध्या चर्चेत आली आहे.

नुकताच या दोघांचा वेड हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे, या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलंय.

रितेश देशमुखने या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. तर जिनिलियाने या चित्रपटातून मराठीत एन्ट्री केली आहे.

रितेश-जेनेलिया या जोडीचे बॉलिवूडमध्ये तुझे मेरी कसम या चित्रपटातून पदार्पण झाले. या चित्रपटानंतर दोघांची लव्हस्टोरीदेखील सुरु झाली, मात्र लग्न करण्याआधी जिनिलियाने रितेशसमोर एक अट ठेवली होती.

काही दिवसांपूर्वी रितेश आणि जिनिलियाने ‘बॉम्बे जर्नी’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी रितेशने जिनिलियाला लग्नाची मागणी कशी घातली याबद्दल खुलासा केला.

रितेश म्हणाला की, जिनिलियाने मला सांगितले की लग्न ठरले मात्र तू जोपर्यंत मला प्रपोज करत नाहीस तोपर्यंत मी मंडपात येणार नाही.

यावर जिनिलियाने म्हटले की, आम्ही बरीच वर्ष रिलेशनशिपमध्ये होतो. आम्ही यात कसे पडलो आमचे आम्हाला कळले नाही. आम्ही लग्नापर्यंत हेच सांगत होतो की आम्ही मित्र आहोत.

मात्र मी रितेशला सांगितले की मला प्रपोजल हवं आहे पुढे जाऊन मी माझ्या मुलांना काय सांगू? त्यावर रितेशने उत्तर दिले की मी लग्नाच्या पाच दिवस आधी तिला म्हणालो मी तुला ताज हॉटेलात घेऊन जातो.

रितेश पुढे म्हणाला, आम्ही ताजसमोर उतरलो आणि तिथे एक बोट होती त्यात आम्ही दोघे बसलो. माझ्या मित्राची बोट होती. त्यावर आम्ही गेलो संध्याकाळची वेळ होती, त्यावेळी आम्ही कधीच वांद्रे परिसरात भेटायचो नाही. आम्ही काही टाउन भागात भेटायचो कारण कोणी बघू नये म्हणून आम्ही बोटीत बसलो. मी आमच्या आवडीचा पिझ्झा ठेवला.

आम्ही मरिन ड्राईव्हपर्यंत आलो तिथून मी माझ्या मित्राला मेसेज केला. तो मरिन ड्राईव्ह परिसरात राहत होता. त्याने त्याच्या घरावरून फटाके फोडले आणि मी जिनिलीयाला सांगितलं की हे सगळं तुझ्यासाठी, माझ्याशी लग्न करशील का?, अशारितीने रितेशने जिनिलियाला प्रपोझ केला.

रितेश जिनिलियाने ३ फेब्रुवारी २०१२ रोजी लग्न केले. आता त्यांना दोन मुले आहेत.