नवरा सुपरस्टार असूनही ज्युनिअर NTR ची पत्नी राहते प्रचंड साधी; फोटो पाहून तुम्हीही कराल कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 01:57 PM2022-04-05T13:57:58+5:302022-04-05T14:04:22+5:30

Jr. NTR: ज्युनिअर एनटीआर आणि लक्ष्मी यांच्या लग्नसोहळ्याला जवळपास १५ हजारांपेक्षा जास्त पाहुणे मंडळी उपस्थित असल्याचं सांगण्यात येतं.

दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर (Jr. NTR) याचा'आरआरआर' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड करत आहे.

आतापर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ८०० ते ९०० कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत असल्याचं पाहायला मिळत आहे.

दाक्षिणात्य कलाविश्वाप्रमाणेच बॉलिवूडमध्येही त्याची क्रेझ असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात.

ज्युनिअर एनटीआरच्या प्रोफेशनल लाइफविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. त्यामुळे आज आपण त्याच्या पर्सनल लाइफविषयी आणि खासकरुन त्याच्या पत्नीविषयी जाणून घेऊयात.

ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीचं नाव लक्ष्मी प्रनथी असं असून या दोघांच्या वयात सुमारे १० वर्षांचं अंतर असल्याचं सांगण्यात येतं.

लक्ष्मी ही प्रसिद्ध उद्योगपती श्रीनिवास राव यांची मुलगी आहे. तसंच ती तेलुगू न्यूज चॅनल 'स्टुडिओ एन' ची मालक आहे.

ज्युनिअर एनटीआर आणि लक्ष्मी यांच्या लग्नसोहळ्याला जवळपास १५ हजारांपेक्षा जास्त पाहुणे मंडळी उपस्थित असल्याचं सांगण्यात येतं.

लक्ष्मी सोशल मीडियावर फारशी सक्रीय नसून ती रिअल लाइफमध्येही अतिशय साधेपणाने राहते.

ज्युनिअर एनटीआरने सोशल मीडियावर तिच्या पत्नीचे काही फोटो शेअर केले आहेत.

या दोघांना अभय राम आणि भार्गव राम ही दोन मुलेदेखील आहेत.