सई ताम्हणकरने परिधान केला 'आजोबांचा पायजमा'; अभिनेत्रीची हटके फॅशन पाहून चाहते थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 14:48 IST2025-03-04T14:28:26+5:302025-03-04T14:48:46+5:30

सई ताम्हणकरने परिधान केलेल्या आजोबांच्या पायजम्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे (sai tamhankar)

सई ताम्हणकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. सई सध्या अनेक हिंदी सिनेमे आणि वेबसीरिजमध्येही अभिनय करतेय

सई ताम्हणकरने सोशल मीडियावर नवीन फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये सई ताम्हणकरने आजोबांचा पायजमा परिधान केला आहे

सईने आजोबांचा पायजमा परिधान करुन तिच्या फॅशनला ग्लॅमरसचा तडका लावला आहे. सईच्या या फोटोशूटवर तिच्या चाहत्यांनी पसंती दिली आहे.

सई ताम्हणकरने पायजमाला मॅचिंग असा सूट परिधान केलाय. एकूणच पारंपरिक फॅशनला सईने ग्लॅमरचा तडका लावला आहे

सई ताम्हणकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती नुकतीच डब्बा कार्टल आणि क्राईम बिट या वेबसीरिजमध्ये झळकताना दिसली

याशिवाय सई सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोचं सूत्रसंचानल करत आहेत. सईच्या सूत्रसंचालनाचा खास अंदाज सर्वांचं लक्ष वेधतोय

सई ताम्हणकर लवकरच प्रसाद ओक, समीर चौघुले आणि ईशा डे या कलाकारांसोबत गुलकंद या मराठी सिनेमात झळकणार आहे. १ मेला हा सिनेमा रिलीज होतोय.