Saie Tamhankar : सई ताम्हणकरने घटस्फोटानंतर केली होती त्याच्यासोबत पार्टी, म्हणाली, "डिपार्ट पार्टी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 12:19 PM2023-04-30T12:19:31+5:302023-04-30T12:34:26+5:30

सईने अजूनही 'त्या' स्पेशल तारखेचा टॅटू ठेवला आहे.

मराठीमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे सई ताम्हणकर(Saie Tamhankar). सध्या तिची चर्चा मराठीसोबतच बॉलिवूडमध्येही आहे. सईचं करिअर सध्या भरारी घेतंय. गेल्या वर्षीच तिच्या 'मिमी' या सिनेमातील भूमिकेसाठी तिला सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

याशिवाय सई मराठी सिनेमातही तितकीच सक्रिय आहे. 'पॉंडिचेरी' या सिनेमात तिने उत्तम भूमिका साकारली. तसंच भाडिपाच्या 'बेरोजगार' या सिरीजमध्येही तिने भूमिका साकारली.

सईचं प्रोफेशनल आयुष्य भरारी घेत असतानाच तिच्या वैयक्तिक आयुष्याचीही चर्चा असते. सईचा याआधी घटस्फोट झाला आहे. 2013 मध्ये सईने अमेय गोसावीशी लग्न केलं होतं. अमेय हा देखील सिनेक्षेत्राशीच निगडित आहे.

दोघांच्या लग्नाची त्यावेळी जोरदार चर्चा रंगली होती.स्वप्नील जोशीसह कलाक्षेत्रातील अनेकांनी लग्नाला हजेरी लावली होती. मात्र दोनच वर्षात त्यांच्यात खटके उडायला लागले. शेवटी त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि 2015 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

सईने एका कार्यक्रमात खुलासा केला की घटस्फोटाची शेवटची सही केल्यानंतर आम्ही पार्टी केली होती. आम्ही मित्रमैत्रिणींनाही पार्टीसाठी बोलावले होते.आणि मजा केली. डिपार्ट पार्टी, ब्रेकअप पार्टी असं त्याला सगळ्यांनी नाव दिलं.

पण सई म्हणते, आम्ही फक्त एका ड्रिंकसाठी गेलो होतो सगळे आम्हाला भेटले. काही दिवसांच्या या प्रक्रियेतून क्षीण आला असतो तो दूर होतो म्हणून आम्ही ती पार्टी केली. पण अमेय नेहमीच माझ्या आयुष्यातील स्पेशल व्यक्ती असेल कारण तो खरंच खूप चांगला आहे.

सईच्या खांद्यावर आजही स्पेशल डेट कोरली गेली आहे. तिने २२ जून २०१३ अशा डेट चा टॅटू खांद्यावर आजही ठेवला आहे. आज त्या तारखेला काही अर्थ उरलेला नाही कारण ती व्यक्तीच आयुष्यात नाही पण तरी मी टॅटू ठेवलाय असं सई म्हणाली.

आता सई अनिश जोगळेसह रिलेशनशिपमध्ये आहे. अनिश सोबत फोटो पोस्ट करुन दौलतराव सापडला असं तिने कॅप्शन दिलं होतं. अनिश हा सिनेनिर्माता आहे. गर्लफ्रेंड, मुरांबा, वायझेड आणि टाईमप्लीज अशा काही सिनेमांची त्याने निर्मिती केली आहे.