सैफ अली खानला प्रॉपर्टी स्कॅमचा फटका; बिल्डरमुळे गमावली कमाईतील ७० टक्के रक्कम By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 06:36 PM 2021-11-18T18:36:44+5:30 2021-11-18T18:42:18+5:30
Saif ali khan: एक प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी मी माझ्या मिळकतीमधील जवळपास ७० टक्के रक्कम गुंतवले होते. परंतु, आजतागायत ती प्रॉपर्टी मला मिळाली नाही, असं सैफ म्हणाला. घर असो वा एखादी प्रॉपर्टी कोणतेही मोठे व्यवहार करण्यापूर्वी आपण हजारवेळा त्या गोष्टीचा विचार करत असतो. कुठे फसवणूक होणार नाही ना, नुकसान होणार नाही ना याची काळजी घेत असतो. सहाजिकच अशी काळजी आपल्याप्रमाणेच मोठे व्यक्तीही घेत असतात. परंतु, अनेकदा योग्य खबरदारी घेतल्यानंतरही मोठा आर्थिक फटका बसतो. असाच काहीसा प्रकार अभिनेता सैफ अली खानसोबत (Saif Ali Khan) घडला आहे.
लवकरच सैफचा 'बंटी और बबली 2' (Bunty Aur Babli 2) हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सैफ आणि त्याची टीम चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहेत.
या चित्रपट प्रमोशनचा एक भाग म्हणून चित्रपटाच्या मेकर्सने 'चाय पे चर्चा' या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात सैफ आणि राणी एकमेकांसोबत चर्चा करताना दिसत आहेत.
चाय पे चर्चा करत असताना सैफ आणि राणीने त्यांच्या करिअरसोबत पर्सनल लाइफवरही चर्चा केली. यावेळी सैफने त्याला प्रॉपर्टी खरेदी करताना कसं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं हे सांगितलं.
एक प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी मी माझ्या मिळकतीमधील जवळपास ७० टक्के रक्कम गुंतवले होते. परंतु, आजतागायत ती प्रॉपर्टी मला मिळाली नाही, असं सैफ म्हणाला.
"मला सुद्धा प्रॉपर्टी स्कॅमचा फटका बसला आहे. काही वर्षांपूर्वी मी एका प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवले होते. त्यावेळी मी माझ्या कमावलेल्या संपत्तीपैकी ७० टक्के रक्कम बिल्डरच्या सांगण्यावरुन गुंतवले होते. त्यावेळी मला सांगितलं की ३ वर्षांमध्ये हे प्रॉपर्टी तयार होईल. पण आजपर्यंत मला ती प्रॉपर्टी मिळालेली नाही", असं सैफ म्हणाला.
दरम्यान, या चर्चांमध्ये सैफने त्याच्या काही चाहत्यांचे आलेले अनुभवदेखील सांगितले. हे अनुभव ऐकून राणीला हसू आलं होतं.
राणी आणि सैफ यांचा 'बंटी और बबली 2' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी या दोघांनी 'हम तुम', 'ता रा रम पम' आणि 'थोड़ा प्यार थोड़ा मैजिक' या चित्रपटांमध्ये एकत्र स्क्रीन शेअर केली आहे.