Sakshi Chopra : रामायण मालिकेचे निर्माते रामानंद सागर यांच्या नातीची उर्फीशी तुलना, बोल्डनेसमध्ये पार केल्या सर्व मर्यादा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 11:31 AM2023-01-19T11:31:39+5:302023-01-19T11:41:13+5:30

उर्फीपेक्षाही विचित्र कपडे घालत साक्षी चोप्राने सर्व मर्यादा तोडल्या आहेत.

आपल्या विचित्र फॅशनसाठी ओळखली जाणारी उर्फी जावेदला स्पर्धा देणारी आणखी एक मॉडेल आहे. ती म्हणजे साक्षी चोप्रा.

रामायण या लोकप्रिय मालिकेचे निर्माते रामानंद सागर यांची साक्षी ही नात आहे. तिचे सोशल मीडियावरील फोटो पाहून तिची उर्फीशी तुलना होऊ लागली आहे.

साक्षी प्रचंड बोल्ड असून बिकीनी, किंवा विचित्र फॅशनचे रिव्हीलिंग कपडे घालत ती नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असते. तिचे फोटोशूट कायम चर्चेत असते.

साक्षी अमेरिकेत असते. ती गायिका आणि लेखनही करते. तसेच ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. तिचे इन्स्टाग्रामवर ५ लाख फॉलोअर्स आहेत.

साक्षीने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. तिच्या अनेक फोटोंवरुन ती ट्रोलही होत असते.

साक्षीला बिग बॉस १४ साठी ऑफरही देण्यात आली होती. मात्र तिने ती नाकारली. ती अमेरिकेतच स्थायिक असून भारतात फार कमी वेळा येते.

साक्षीला बिग बॉस १४ साठी ऑफरही देण्यात आली होती. मात्र तिने ती नाकारली. ती अमेरिकेतच स्थायिक असून भारतात फार कमी वेळा येते.

साक्षीचे युट्युब चॅनलही आहे. त्यावर तिचे २७ हजार सबस्क्रायबर्स आहेत. मात्र ती युट्युब व्हिडिओमध्ये फारशी सक्रिय नसते.

साक्षी फिल्म निर्मात्या मीनाक्षी सागर यांची मुलगी आहे. तिच्या बोल्ड फोटोंमुळे ती कायम चर्चेत असते. तिने तर उर्फीलाही मागे टाकले असं म्हणत नेटकरी तिला ट्रोल करत असतात.