'तो एक आठवडाही...'; स्वत:ला व्हर्जिन म्हणणाऱ्या सलमानच्या या वाक्यावर अरबाजने केला धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 01:37 PM2021-12-27T13:37:08+5:302021-12-27T13:43:40+5:30

Salman khan: वयाची ५६ गाठलेल्या सलमानने आजपर्यंत लग्न केलेलं नाही. मात्र, या काळात त्याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. प्रत्येक कार्यक्रमातही त्याच्या लग्नाविषयी त्याला हमखास प्रश्न विचारले जातात.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आज त्याचा ५६ वा वाढदिवस साजरा करत आहे. आजवरच्या कारकिर्दीत असंख्य चित्रपट करणारा सलमान बऱ्याचदा त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत येत असतो.

वयाची ५६ गाठलेल्या सलमानने आजपर्यंत लग्न केलेलं नाही. मात्र, या काळात त्याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. प्रत्येक कार्यक्रमातही त्याच्या लग्नाविषयी त्याला हमखास प्रश्न विचारले जातात.

सध्या सोशल मीडियावर त्याचा एक जुना इंटरव्ह्यू चर्चेत येत आहे. या मुलाखतीत त्याने त्याच्या सेक्शुअल लाइफविषयी काही खुलासे केले आहेत. इतकंच नाही तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर त्याचा भाऊ अरबाज खान यानेदेखील धक्कादायक खुलासा केला आहे.

काही काळापूर्वी सलमानने चित्रपट दिग्दर्शक करण जोहर याच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी करणने सलमानला त्याच्या सेक्स लाइफबद्दल काही प्रश्न विचारले.

करणच्या प्रश्नावर 'मी व्हर्जिन आहे आणि आतापर्यंत कोणत्याही व्यक्तीसोबत संबंध प्रस्थापित केलेले नाहीत, असं सलमानने उत्तर दिलं होतं.

करणच्या या शोमध्ये काही वर्षांनी पुन्हा एकदा सलमानने अरबाजसोबत हजेरी लावली होती. यावेळीदेखील करणने सलमानला पुन्हा तोच प्रश्न विचारला.

"अजूनपर्यंत काहीही बदललेलं नाही. माझं आजही तेच उत्तर आहे जे आधी दिलं होतं. मी व्हर्जिनच आहे", असं सलमान म्हणाला होता. सलमानचं हे उत्तर ऐकल्यावर अरबाज हसू लागला आणि, "हा वर्कआऊट आणि सेक्सशिवाय एक महिना अजिबात राहू शकत नाही", असं म्हणाला.

आतापर्यंत सलमानचं नाव ऐश्वर्या राय, कटरिना कैफ, संगिता बिजलानी, सोमी अली, युलिया वंतूर यांसारख्या अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं आहे.