Salman Khan Kisses Aishwarya Rai In Unseen Pictures viral on social media
सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचे 'ते' Unseen फोटो होतायेत व्हायरल By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 11:57 AM2024-08-06T11:57:23+5:302024-08-06T12:19:27+5:30Join usJoin usNext सलमान खान आणि ऐश्वर्या यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा चाहता वर्ग मोठा आहे. लाखो लोकांना सलमानचं वेड आहे. पहिल्या सिनेमापासून आजतागायत तो प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करत आहे. सलमान त्याच्या पर्सनल लाईफमुळे कायम चर्चेत राहिला. सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचे प्रेमप्रकरण जगजाहीर आहे. एकेकाळी हे दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. पण या प्रेमाला वादाची मोठी किनार आहे. इतका मोठा काळ उलटला असूनही दोघांचं नात आजही चर्चेत असतं. आता दोघांचे काही जुने फोटो व्हायरल होत आहेत. सध्या व्हायरल होत असलेले हे फोटो खूप जुने आहेत. त्यांच्या डेटिंगच्या वेळचे आहेत. ज्यामध्ये सलमान ऐश्वर्या एकत्र दिसून येत आहेत. एका फोटोमध्ये सलमान ऐश्वर्या रायच्या गालावर कीस करताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोत सलमान ऐश्वर्यालाशी प्रेमाने बोलताना दिसून येत आहे. सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांंनी एकेकाळी एकमेकावर जीव ओतला पण, आता दोघेही वेगळे आहेत. ऐश्वर्या तिच्या आयुष्यात आनंदी आहे. तर सलमानही पुढे गेला आहे. पण सलमान अजूनही अविवाहितच आहे. सलमान आणि ऐश्वर्या यांची प्रेमकहाणी संजय लीला भन्साळी यांच्या 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटादरम्यान सुरू झाली होती. चित्रपटादरम्यानच ते एकमेकांवर प्रेम करू लागले होते. मात्र 'हम तुम्हारे हैं सनम' (2002) या सिनेमाच्या रिलीजनंतर दोघांचे ब्रेकअप झाले होते. या सिनेमात ऐश्वर्या सलमानच्या प्रेयसीच्या भूमिकेत झळकली होती. दोघांच्या ब्रेकअपचे खरे कारण काय होते? हे तर फार कमी जणांना ठाऊक आहे. मात्र कथितरित्या ऐश्वर्याने सलमानवर मारहाण केल्याचा आरोप लावला होता. 2007 साली ऐश्वर्याने अभिषेक बच्चनसोबत लग्न केले. आराध्या नावाची एक गोड मुलगी ऐश्वर्या आणि अभिषेक यांना आहे. टॅग्स :सलमान खानऐश्वर्या राय बच्चनसेलिब्रिटीबॉलिवूडदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टSalman KhanAishwarya Rai BachchanCelebritybollywoodLove Story