समंथा ते अल्लू अर्जुन! दाक्षिणात्य कलाकारांचे निकनेम माहितीयेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 05:50 PM2022-06-23T17:50:44+5:302022-06-23T18:00:07+5:30

South indian actor: आज दाक्षिणात्य कलाविश्वातील काही लोकप्रिय कलाकारांचे निकनेम म्हणजेच टोपणनावं कोणती ते जाणून घेऊयात.

गेल्या काही काळात दाक्षिणात्य चित्रपटांची प्रेक्षकांमध्ये क्रेझ वाढ आहे. त्यामुळे सध्या बॉलिवूडमध्येही साऊथ कलाकारांचा दबदबा निर्माण होताना दिसून येतो.

बॉलिवूड कलाकारांप्रमाणेच साऊथमधील अनेक कलाकार सध्याच्या घडीला लोकप्रिय असून त्यांच्याविषयीचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

आज दाक्षिणात्य कलाविश्वातील काही लोकप्रिय कलाकारांचे निकनेम म्हणजेच टोपणनावं कोणती ते जाणून घेऊयात.

अल्लू अर्जुन - पुष्पा या चित्रपटामुळे सध्या विशेष चर्चेत येत असलेला अभिनेता म्हणजे अल्लू अर्जुन.

उत्तम अभिनयामुळे चर्चेत येणाऱ्या अल्लू अर्जुनचं टोपणनाव बनी असं आहे.

महेश बाबू- साऊथसह बॉलिवूडमध्येही प्रचंड लोकप्रिय असलेला अभिनेता म्हणजे महेश बाबू.

साऊथ चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या या अभिनेत्याचं निकनेम नानी असं आहे.

रश्मिका मंदाना - नॅशनल क्रश म्हणून देशभरात लोकप्रिय असलेली रश्मिका मंदाना हिचंदेखील निकनेम आहे.

रश्मिकाला प्रेमाने सगळे नोनू असं म्हणतात.

प्रभास - साऊथचा बाहुबली अर्थात प्रभास याचं खरं नाव घेणं अनेकांना शक्य होत नाही. त्याचं खरं नाव व्यंकट सत्यनारायण प्रभास राजू उप्पलपती असं आहे.

प्रभासचं खर नाव मोठं असल्यामुळे सगळे त्याला प्रभा असंच म्हणतात.

रामचरण - दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत लोकप्रिय अभिनेता म्हणजे रामचरण.

‘आरआरआर’ फेम रामचरणचे निकनेम ‘चेरी’ असं आहे.

राणा डग्गुबती - राणा डग्गुबती याचं देखील टोपणनाव असून त्याच नावाने तो ओळखला जातो.

राणाचं टोपणनाव फायरी असं आहे.

समांथा - दाक्षिणात्य चित्रपटात सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून समांथा रुथ प्रभूकडे पाहिलं जातं.

समंथाच निकनेम सॅम असं आहे.