समंथा रुथ प्रभूच्या 'शकुंतला' भूमिकेवर चाहते झाले फिदा; ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 09:59 AM2023-01-31T09:59:34+5:302023-01-31T10:09:02+5:30

samantha ruth prabhu : समंथाच्या चाहत्यांना 'शकुंतलम' चित्रपटाचा हा ट्रेलर खूपच आवडला आहे.

समंथा रुथ प्रभू 'शकुंतला' या भूमिकेतून लोकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटात समंथा एका वेगळ्या अंदाजात दिसणार आहे.

प्रसिद्ध संस्कृत कवी कालिदास यांच्या 'कालिदास शाकुंतलम' या महाकाव्यावर बनत असलेल्या चित्रपटात समंथा रुथ प्रभू मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'शकुंतलम' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये शकुंतलाला मिळालेला शाप, तिची प्रेमात फसवणूक आणि तिच्या आयुष्यातील अडचणी खूप छान दाखवण्यात आल्या आहेत.

समंथाच्या चाहत्यांना 'शकुंतलम' चित्रपटाचा हा ट्रेलर खूपच आवडला आहे. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने पुन्हा एकदा साऊथची ही अभिनेत्रीने चाहत्यांना घायाळ करणार आहे.

'शकुंतलम' या चित्रपटात देव मोहन राजा दुष्यंतची भूमिका साकारत आहे. समंथा आणि देव मोहनच्या केमिस्ट्रीला चाहत्यांनीही ग्रीन सिग्नल दिला आहे.

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या 'शकुंतलम' चित्रपटाच्या ट्रेलरच्या कमेंट बॉक्समध्ये समंथा आणि देव मोहन यांच्या भूमिकेचे कौतुक चाहत्यांकडून केले जात आहेत.

दरम्यान, समंथाचा 'शकुंतलम' हा चित्रपट अल्लू अर्जुनसाठी देखील खूप खास आहे, कारण या चित्रपटात त्याची 6 वर्षांची मुलगी दिसणार आहे.

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' या चित्रपटातील 'ओ अंटावा' या ब्लॉकबस्टर गाण्यामुळे समंथाला देशभरात प्रचंड प्रसिद्धी मिळाली. याशिवाय 'द फॅमिली मॅन 2' या वेब सीरिजमध्ये तिने आपल्या दमदार अभिनय कौशल्याची झलक दाखवली.