सौंदर्याच्या बाबतीत भूमी पेडणेकरवरही मात करते तिची सख्खी बहीण; अभिनय नव्हे 'या' क्षेत्रात करतीये यशस्वी वाटचाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 13:51 IST2022-04-10T13:46:52+5:302022-04-10T13:51:24+5:30

Bhumi pednekar: समीक्षादेखील भूमीप्रमाणे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून ती कायम तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

दमदार अभिनय आणि स्पष्टवक्तेपणा यामुळे कायम चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे भूमी पेडणेकर.

गेल्या काही दिवसांपासून भूमी तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत येत आहे.

अलिकडेच भूमीने तिचं ट्रान्सफर्मेशन केलं असून ती पूर्वीपेक्षा जास्त गॉर्जियस दिसते.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या भूमीने अलिकडेच तिच्या बहिणीसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या बहिणीला पाहिल्यावर नेटकऱ्यांनी तिच्या बहिणीविषयी जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

भूमी पेडणेकरच्या बहिणीचं नाव समीक्षा पेडणेकर असं आहे.

समीक्षादेखील भूमीप्रमाणे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून ती कायम तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

समीक्षा कलाविश्वापासून दूर असून ती वकील आहे.

अलिकडेच समीक्षाने एक नवं फोटोशूट केलं असून तिचे फोटो चर्चेत येत आहेत.

समीक्षा अनेकदा तिच्या ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येते.

समीक्षा तिचे घरातील फोटोही शेअर करत असते.

समीक्षाने शेअर केलेला सुंदर फोटो