PHOTOS : बुर्ज खलिफा अन् अस्सल सोन्याची कॉफी...! सना खानला नवऱ्यानं दिलं झक्कास सरप्राईज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 16:29 IST2021-04-01T16:15:14+5:302021-04-01T16:29:36+5:30
या कॉफीमध्ये खऱ्या खुऱ्या सोन्याचा वापर केला जातो, असा दावा सनानं केला आहे. किंमत पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क

बिग बॉस 6 ची स्पर्धक आणि जय हो, वजह तुम हो, टॉयलेट-एक प्रेमकथा अशा सिनेमात झळकलेली अभिनेत्री सना खानने (Sana Khan) फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेऊन सर्वांना धक्का दिला होता. ही सना सध्या काय करतेय, तर चक्क सोन्याची कॉफी पितेय.
होय,सनाने जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफामधील (Burj Khalifa) फोटो व व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओमध्ये ती चक्क सोन्याची कॉफी पिताना दिसत आहे. या कॉफीची किंमत पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.
बुर्ज खलीफामध्ये कॉफी डेट, हे पतीकडून मिळालेलं सरप्राईज होतं. या इमारतीच्या 122 व्या मजल्यावर एक प्रसिद्ध रेस्तरॉ आहे. हे रेस्तरॉ आपल्या खास प्रकारच्या कॉफींसाठी जगप्रसिद्ध आहे. या ठिकाणी सनाने गोल्ड प्लेटेड कॅपेचीनोचा आस्वाद घेतला.
या कॉफीची किंमत 160 दिरहम इतकी आहे. म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये जवळपास 3200 रुपये. या कॉफीमध्ये ख-या खु-या सोन्याचा वापर केला जातो, असा दावा सनाने केला आहे.
फिल्म इंडस्ट्री सोडल्यानंतर अगदी काहीच दिवसात सनाने सूरतचा बिझनेसमॅन मौलाना अनस सईदसोबत गूपचूप ‘निकाह’ केला. सनाने असे एका रात्रीत ‘निकाह’ केल्याने सगळेच हैराण झाले होते. पण हा एका रात्रीचा मामला नाहीच मुळी. कारण सना 2017 पासून अनस सईदला ओळखत होती. सनाने एका ताज्या मुलाखतीत याबद्दल सांगितले होते.
बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सनाने तिच्या व सईद अनसच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितले होते. सना व सईदची पहिली भेट 2017 मध्ये झाली होती.
तिने सांगितले होते, आम्ही पहिल्यांदा मक्केत भेटलो होतो. मी भारतात परतली होती. ही एक छोटीशी भेट होती. अनस हा एक मुस्लिम स्कॉलर आहे, असे सांगून माझी व त्याची ओळख करून देण्यात आली होती.
यानंतर 2020 मध्ये आम्ही पुन्हा संपर्कात आलोत. अनससोबत निकाह करण्याचा निर्णय मी एका रात्रीत घेतला नाही. त्याच्यासारखा शौहर मिळावा म्हणून मी अनेक प्रार्थना केल्या होत्या.