"ही तर तुमच्याकडून भांडी घासून घेईल...", टोमणे ऐकल्याने माझ्या सासूने...सना खानचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 17:58 IST2025-01-06T17:49:21+5:302025-01-06T17:58:02+5:30

सना खानने केला खुलासा, बॉलिवूडचा भाग असल्याने तिच्या सासूने...

अभिनेत्री सना खान (Sana Khan) सध्या दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे चर्चेत आहे. २०२३ मध्येच तिने मुलाला जन्म दिला. आता ती दुसऱ्यांदा आई होणार आहे.

सना खानने बॉलिवूड इंडस्ट्री सोडून धर्माचा रस्ता स्वीकारला. २०२० साली तिने मुफ्ती अनस सय्यदसोबत निकाह केला. यासोबतच तिने अभिनय क्षेत्राला रामराम केला.

नुकतंच एका मुलाखतीत सना म्हणाली की निकाहावेळी अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले होते. सासू सासऱ्यांना टोमणे ऐकावे लागले होते.

ती म्हणाली, "लग्नाआधी मी बॉलिवूडचा भाग होते. त्यामुळे नंतर अशा कुटुंबात जाणं जिथे हिजाब घालून चेहरा झाकावा लागतो. हे लोकांसाठी जरा शॉकिंग होतं."

"माझ्याशी लग्न करण्याआधी सासूने माझ्या पतीला एकच विचारलं की ती खरंच आपल्यासोबत अॅडजस्ट करेल का? कारण तिची लाईफस्टाईल बदलणार आणि आपल्या घरातलं वातावरण वेगळं आहे."

वेळेनुसार आपल्यात बदल होतो. पण एकदम सगळ्या गोष्टी बदलणं शक्य नाही. ती खरंच करु शकेल का? तेव्हा माझे पती म्हणाले की, 'माहित नाही.पण जे होईल त्यात आपण मदत करु."

"माझे सासू सासरे आधीपासूनच माझ्या सपोर्टमध्ये होते. आमचं लग्न झालं तेव्हा अनेकांनी टोमणे मारले की ही तर आपल्या सासूकडूनच भांडी घासून घेईल. यांचं लग्न ३ महिने जास्तीत जास्त ६ महिनेच टिकेल. ही मुलांना जन्म देणार नाही. पळून जाईल."

"मला हे सगळं माझ्या प्रेग्नंसीच्या काळात सांगण्यात आलं. माझ्या सासू सासऱ्यांनी कधीच मला डिमोटिव्हेट केलं नाही. त्यांनी फक्त माझ्यासोबत या गोष्टी शेअर केल्या. पण त्यांन खरंच किती काय ऐकून घ्यावं लागलं याचं वाईट वाटतं."