sanjeeda shaikh looks mesmerising in pink lehenga latest photo viral
संजीदा शेखनं गुलाबी रंगाचा लेहंगा घालून केलं शानदार फोटोशूट, फोटो पाहून म्हणाल… By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 04:03 PM2024-04-11T16:03:20+5:302024-04-11T16:13:29+5:30Join usJoin usNext टीव्ही अभिनेत्री संजीदा शेख ही इंडस्ट्रीमध्ये तिच्या जबरदस्त व्यक्तिमत्त्वासाठी ओळखली जाते. अभिनयासोबतच ती सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. ती रोज तिचे नव-नवीन व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. चाहतेही तिचे फोटो पाहण्यासाठी उत्सुक असतात. संजीदाचा आता एक नवीन लूक समोर आला आहे. नेहमीप्रमाणे या लूकचेही चाहत्यांकडून कौतुक होत आहे. संजीदानं गुलाबी रंगाचा लेहेंगा घातला आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. हलका मेकअप, गळ्यात नेकलेस आणि बांगड्या घालून साराने तिच्या पारंपरिक लुकला खास टच दिला आहे. कॅमेऱ्यासमोर आपली स्टाईल दाखवत तिनं आपल्या चाहत्यांना घायाळ करून सोडले आहे. सुंदर अशा पोज संजीदाने दिल्या आहेत. संजीदाची ही स्टाईल तिच्या चाहत्यांना वेड लावत आहे. हे फोटो आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. संजीदाने क्या होगा निम्मो का, कयामत, क्या दिल में हैं, पिया का प्यारा लागे, एक हसीना थी, इश्क का रंग सफेद यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. संजीदा शेख लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या 'हिरामंडी' या शोमध्ये दिसणार आहे.टॅग्स :संजीदा शेखसेलिब्रिटीबॉलिवूडSanjeeda SheikhCelebritybollywood