आईसारखी माया मला कधीच पापा सैफ अली खानमध्ये दिसली नाही, असे का म्हणाली सारा अली खान By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 12:29 PM 2021-07-02T12:29:28+5:30 2021-07-02T12:45:10+5:30
छोटे नवाब सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंह यांची लेक सारा अली खान नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असते.तिच्याविषयीची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात तिच्या चाहत्यांना फार रस असतो. सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंह यांचा घटस्फोटो झाल्यानंतर आई अमृताने एकटीने मुलांचा सांभाळ केला.
दोन्ही मुलं सैफपेक्षा आई अमृताशी जास्त क्लोज आहेत.
त्यामुळे दोन्ही मुलांच्या आयुष्यात आईपेक्षा जास्त अजून कोणी नाही हेच वेळोवेळी सिद्धही झाले आहे.
आई आणि वडिल दोघांच्या नात्यावर भाष्य करताना सारानेही तिच्या मनात भावनांना वाट मोकळी करुन दिली.
पापा सैफ पेक्षा आई अमृतावरच माझे जास्त प्रेम असल्याचे तिने म्हटले आहे.
अगदी लहान वयातच दोघांचा घटस्फोट झाला असला तरी पापा सैफला मी चांगलीच ओळखत असल्याचे तिने म्हटले आहे.
पापा सैफ अगदी माझ्यासारखेच आहेत आमचा स्वभाव आणि विचार खूप जुळतात.
पण तरी वडिलांमध्ये आईसारखी माया मला कधीच दिसली नसल्याचे साराने म्हटले आहे.