Sara Tendulkar Viral Photo : Sachin Tendulkarची लेक सारा तेंडुलकरने जिममधला फोटो केला पोस्ट; Instagram स्टोरी शेअर करत खास व्यक्तीला म्हणाली Thank You!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 06:21 PM2022-02-22T18:21:18+5:302022-02-22T18:40:45+5:30

सचिनचा मुलगा अर्जुन आणि मुलगी सारा दोघेही कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चर्चेत असतात.

Sara Tendulkar Viral Photo Instagram : भारताचा मास्टरब्लास्टर Sachin Tendulkar हा निवृत्तीनंतरही कायम चर्चेत असतो. केवळ सचिनच नव्हे तर त्याचा मुलगा Arjun Tendulkar आणि त्याची लेक सारा तेंडुलकर हे दोघेही चर्चेत असतात.

सचिनची लेक सारा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर खूप अँक्टिव्ह असते. कोणत्याही पिकनीकला किंवा लग्न समारंभाला गेल्यावर ती स्वत:चे खास फोटो काढून घेते आणि ते इन्स्टाग्रामवर नियमीतपणे पोस्ट करत असते.

मंगळवारीदेखील साराने असाच एक फोटो आपल्या इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर पोस्ट केला. विशेष म्हणजे या फोटोत तिने एका व्यक्तीला तिच्या दिवसाची सुंदर सुरूवात करून दिल्याबद्दल धन्यवाद म्हटलं.

सारा इन्स्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे. तिचे १७ लाख फॉलोअर्स आहेत. सारा तिच्या नवनव्या फॅशनमुळे किंवा अफेअरच्या गॉसिपमुळे चर्चेत असते.

साराचं नाव टीम इंडियाचा सलामीवीर शुबमन गिल याच्याशी जोडण्यात आलं होतं. दोघांच्या इन्स्टाग्राम पोस्टमधील साधर्म्यामुळे हे दोघे एकमेकांना डेट करतात अशी चर्चा क्रिकेटवर्तुळात रंगली होती.

काही दिवसांपूर्वी सारा तिच्या एका मित्रासोबत दुपारच्या वेळी वांद्रे येथील एका हॉटेलमधून बाहेर पडताना पत्रकारांनी पाहिलं. त्यावेळीही 'तो' मुलगा नक्की कोण? असा सवाल अनेकांनी विचारला होता.

सारा तिच्या फिटनेसवर विशेष लक्ष देत असते. तसेच, ती लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक असल्याने तिच्याबाबत जाणून घेण्याची चाहत्यांना प्रचंड आतुरता असते. त्यामुळे ती सार्वजनिक ठिकाणी कुठेही दिसली तरी ती कोणाबरोबर आहे, याकडे चाहत्यांचं लक्ष असतं.

पण आज मात्र साराने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून ज्या खास व्यक्तीला धन्यवाद दिले आहेत, ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून तिचे जिम ट्रेनर आहेत.

साराने एका डायट ज्युसचा फोटो पोस्ट करत जिम ट्रेनर कोच गोपाल यांना धन्यवाद म्हटलं. तुमच्यामुळे माझ्या दिवसाची सुरेख सुरूवात झाली असंही तिने लिहिलं. कोच गोपाल ( @coachgopal ) हे सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर असून त्यांच्याकडून अनेक बडे सेलिब्रिटी मार्गदर्शन घेत असतात.