'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील सावली खऱ्या आयुष्यात दिसते खूपच ग्लॅमरस, पाहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 16:38 IST2024-12-08T16:31:32+5:302024-12-08T16:38:52+5:30

'सावली' ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव प्राप्ती रेडकर असं आहे. प्राप्ती याआधी काव्यांजली या कलर्स वाहिनीवरील मालिकेत दिसली होती.

'सावळ्याची जणू सावली' ही झी मराठी वाहिनीवरील मालिका अलिकडेच सुरू झाली आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली.

या मालिकेत सावलीचं सारंगसोबत लग्न झालं असून आता ती मेहेंदळेंच्या घरची सून झाली आहे.

पण, मालिकेत सावळी दिसणारी सावली खऱ्या आयुष्यात मात्र फारच ग्लॅमरस आहे.

सावली ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव प्राप्ती रेडकर असं आहे. प्राप्ती याआधी काव्यांजली या कलर्स वाहिनीवरील मालिकेत दिसली होती.

गेल्या काही वर्षांपासून प्राप्ती कलाविश्वात कार्यरत आहे. किती सांगायचंय मला या मालिकेतही तिने काम केलं आहे.

प्राप्ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. तिचे इन्स्टाग्रामवर ६ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.

वैयक्तिक आणि करिअर मधील अपडेट्स प्राप्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देत असते.

तसेच अनेकदा ती तिचे ग्लॅमरस फोटोही शेअर करताना दिसते. मालिकेपेक्षा प्राप्ती खऱ्या आयुष्यात फारच वेगळी दिसते.