Sayali Sanjeev's haldi ceremony photos are going viral
गुलाबाची कळी कशी हळदीनं माखली..!, सायली संजीवच्या हळदी सेरेमनीचे फोटो होतायेत व्हायरल By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 11:27 AM2021-06-18T11:27:30+5:302021-06-18T11:43:21+5:30Join usJoin usNext मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सायली संजीवच्या हळदी सेरेमनीचे फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत असून सर्वत्र तिच्या लग्नाची चर्चा ऐकायला मिळत आहे. मात्र ही लगीनघाई सायलीची नसून कलर्स मराठी वाहिनीवरील मालिका शुभमंगल ऑनलाईनमधील शर्वरीची आहे. लवकरच शर्वरी आणि शंतनू लग्नबेडीत अडकताना दिसणार आहेत. शुभमंगल ऑनलाईन मालिकेमध्ये शंतनूच्या प्रयत्नांना यश आले आहे. आता अखेर मालिकेत शंतनू - शर्वरी लग्नबंधनात बांधले जाणार आहेत. शर्वरीच्या आईने म्हणजेच माधुरीने दोघांच्या लग्नास होकार दिला आहे. अनुपमा, शर्वरी, शंतनू सगळेच खुश आहेत. घरच्या घरी नुकतेच मेहंदी सेरेमनी पार पडली. पण, माधुरी मात्र तितकशी आनंदी दिसत नाहीये. कारण, शंतनू शर्वरीसाठी योग्य नाही असे तिचे ठाम मत आहे. जगदीशने माधुरीला सगळं काही सुरळीत सुरू असताना आता मिठाचा खडा टाकलास तर मी तुला घटस्फोट देईन अशी सक्त ताकीद दिली आहे पण माधुरी यामधील कुठलीच गोष्ट शर्वरीला सांगू शकत नाही. शर्वरीच्या हळदीचे फोटो सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहेत. प्रेक्षक शर्वरी आणि शंतनूचा विवाह सोहळा पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. शर्वरीच्या हातावर शंतनूच्या प्रेमाचा रंग चढणार आहे, लग्नाच्या पवित्र बंधनात शंतनू – शर्वरी जोडले जाणार आहेत.टॅग्स :सायली संजीवSayali Sanjeev