चालत्या कारमध्ये अभिनेत्याने अभिनेत्री भावनाचं केलं होतं लैंगिक शोषण, आता ग्लॅमरस लूकची चर्चा By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 02:36 PM 2022-03-14T14:36:02+5:30 2022-03-14T14:50:54+5:30
Bhavana menon : भावना मेनन प्रामुख्याने मल्याळम, तमिळ आणि कन्नड भाषेतील सिनेमात काम करते. ती तिच्या करिअरची सुरूवात वयाच्या १६ व्या वर्षी २००२ मध्ये मल्याळम सिनेमा 'नम्मल'मधून केली होती. कार्तिका मेनन (Karthika Menon) लोक भावना मेनन (Bhavana menon) नावाने जास्त ओळखतात. कार्तिका फिल्म इंडस्ट्रीतील फेमस नाव आहे. ती जास्तकरून साऊथ सिनेमात काम करते आणि काही महिन्यांपूर्वी ती तिच्यासोबत झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे चर्चेत होती. त्यानंतर तिने तिच्या वेदना सांगितलं होत्या आणि या घटनेमुळे तिला किती सहन करावं लागलं हेही सांगितलं होतं. सध्या ती तिच्या ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत आहे. (Photo Credit- Bhavna Menon Instagram)
भावना मेनन प्रामुख्याने मल्याळम, तमिळ आणि कन्नड भाषेतील सिनेमात काम करते. ती तिच्या करिअरची सुरूवात वयाच्या १६ व्या वर्षी २००२ मध्ये मल्याळम सिनेमा 'नम्मल'मधून केली होती.
भावना सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव असे आणि अलिकडे तिच्या डेली रूटीनची माहिती देत असते. सध्या तिच्या नुकत्याच केलेल्या फोटोशूट आणि त्यातील लूकमुळे चर्चेत आहे.
फोटोंमध्ये भावना फारच सुंदर दिसत आहे आणि तिचा ग्लॅमरस अंदाजही दिसत आहे. तिचे फॅन्स तिचा हा अंदाज पाहून तिचं कौतुक करत आहेत.
Govinda Govinda सिनेमात ती अखेरची दिसली होती. हा सिनेमा २०२१ मध्ये आला होता. त्याआधी ती बरेच वर्ष गायब होती. कारण ५ वर्षाआधी तिच्यासोबत एक घटना घडली होती.
फेब्रुवारी २०१७ मध्ये शूटिंगवरून घरी जात असताना भावना मेननला किडनॅप करण्यात आलं होतं. त्यानंतर काही लोकांनी तिच्यावर चालत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार केला. एप्रिल २०१७ मध्ये मीडियाने रिपोर्ट दिला होता की, अभिनेता दिलीप या घाणेरड्या घटनेचा मुख्य होता आणि नंतर चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली होती. नंतर त्याला जामीन मिळाला. ज्यामुळे अभिनेत्रीच्या इमेजचं खूप नुकसान झालं.
२०२२ मध्ये दिलीपसहीत ५ इतर लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यावर आरोप होता की, त्यांनी चौकशी करत असलेल्या अधिकाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला होता. ही माहीत तेव्हा समोर आली जेव्हा काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक बलाचंद्र कुमारने लैंगिक शोषणाबाबत खुलासे केले होते. पण नंतर पुन्हा अभिनेता दिलीपला जामीन मिळाला.
आता भावना त्या घटनेतून बाहेर पडत तिचं जीवन आनंदाने जगत आहे. तिचा पती आणि मित्रांनी तिची या वेदनादायी घटनेतून बाहेर येण्यास खूप मदत केली. या घटनेच्या एक वर्षांनंतर २०१८ मध्ये अभिनेत्रीने Naveen सोबत लग्न केलं होतं.