शाहरुख खानच्या बंगल्यात करू शकता मुक्काम, एका रात्रीसाठी मोजावे लागतील 'इतके' रुपये!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 18:38 IST2025-04-15T18:29:58+5:302025-04-15T18:38:14+5:30
शाहरुखच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, जी स्वप्नवत वाटू शकते.

'किंग ऑफ रोमान्स', 'बादशहा' अशी ओळख असलेल्या शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा कायम चर्चेत असतो. नुकतंच शाहरुख 'मन्नत' सोडून काही दिवसांसाठी दुसऱ्या ठिकाणी राहण्यासाठी गेला आहे.
'मन्नत'मध्ये नुतनीकरणाचं काम सुरू झालं आहे. त्यामुळे शाहरुख कुटुंबासोबत वांद्रे पश्चिम येथील पूजा कासामध्ये शिफ्ट झाला आहेत. ही जागा अभिनेता जॅकी भगनानी व दीपशिखा देशमुख यांच्या मालकीची आहे
शाहरुख खानच्या 'मन्नत' बंगल्याची किंमत आजच्या घडीला जवळपास २०० कोटींच्या घरात आहे. पण, शाहरुखकडे फक्त मन्नतच नाही तर इतरही काही मालमत्ता आहेत. शाहरुखची मुंबईसह दुबई, लंडन आणि यूएसमध्ये कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी आहे.
त्यापैकी महत्त्वाची मालमत्ता म्हणजे अमेरिकेमधील त्याचा आलिशान बंगला. हा बंगला मन्नतपेक्षा कमी नाही. अमेरिकेमधील बेवर्ली हिल्स (Beverly Hills) या प्रतिष्ठित भागात अभिनेत्याचा बंगला आहे.
६ बेडरूम, खाजगी स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट आणि आकर्षक इंटीरियर असलेला हा आलिशान बंगला एखाद्या महालापेक्षा कमी नाहीये. हा बंगला खूप मोठे आणि सुंदर आहे.
२०१९ मध्ये शाहरुख खानने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर या बंगल्यातील काही सुंदर फोटो शेअर केले होते, ज्यांचे चाहत्यांनी खूप कौतुक केले.
टाईम्स ऑफ इंडियानुसार, आता शाहरुखनं या बंगल्याचे दरवाजे सामान्य लोकांसाठी खुले आहेत. अर्थात शाहरुखचा हा बंगला भाडेतत्वावर उपलब्ध झाला आहे.
याच बंगलामध्ये तुम्हाला मुक्काम करण्याची संधी मिळाली आहे. पण, यासाठी तुम्हाला एका रात्रीसाठी सुमारे १.९६ लाख रुपये खर्च करावे लागतील. शाहरुखच्या चाहत्यांसाठी हा अनुभव खूप रोमांचक असू असेल.
शाहरुख आधी अभिनेत्री जान्हवी कपूरने चेन्नईतील श्रीदेवीच्या बंगल्याचे नूतनीकरण करून तो भाड्याने उपलब्ध करून दिला होता. तसेच काजोलही तिचा गोव्यातील व्हिला भाडेतत्वावर उपलब्ध करुन दिला आहे.
शाहरुख खानच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच 'किंग' चित्रपटात दिसणार आहे. किंग खानने २०२३ मध्ये 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' सारख्या सुपरहिट चित्रपटांमधून कमबॅक केलं होतं. याशिवाय, शाहरुख हा मुलगा आर्यन खानच्या शोमध्येही काम करणार आहे.